Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या विविध योजना - Various schemes of the Agriculture

Various schemes of the Agriculture.

Various schemes of the Agriculture

केंद्र व राज्य शासन यांच्या प्रयतानाने कृषी क्षेत्रातील विकासासंदर्भात विविध योजना सरकार राबावत आहे.त्यातील शेतकऱ्यांसाठी लाभदायक खूप साऱ्या अश्या योजना आत्ता देखील चालू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढण्यासाठी,पिकांचे संरक्षण आणि त्यांची जोपासना करण्यासाठी, पिकांवरील आलेली कीड नियंत्रण करण्यासाठीचे कार्यक्रम आणि प्रयोगशाळांची उभारणी,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत व्यापारी पिकांसाठी असलेल्या योजना यांचा यामध्ये समावेश आहे.

आता सिंचनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे शेती आणखी फायद्यात आणणे ही येणाऱ्या काळासाठी तितकेच गरजेचे आहे. हा संपूर्ण विचार करता त्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे.यातील काही योजना आपण पुढे जाणून घेऊ यात.

पंतप्रधान पीक विमा योजना ही अत्यंत उपयुक्त आणि कायम स्वरूपी लाभ देणारी.

केंद्र शासनाने सुरु केलेली पंतप्रधान पीक विमा योजना अत्यंत उपयुक्त आणि फलदायी असून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने फक्त १ रुपया भरुन आपले नाव नोंद करायचे आहे, विमा हप्त्याची रक्कम ही केंद्र शासन भरणार आहे. शेतकऱ्याने आपले आधार कार्डची प्रत, ७/१२ उतारा, बैंक पासबुक झेरॉक्स, पीक पेरणी स्वयंघोषणा पत्र घेऊन आपल्या जिल्ह्य़ातील किंवा आपल्या तालुक्या ठिकाणी असलेले आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन संपूर्ण नाव नोंदणी करावी हे सर्व केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.अवकाळी झालेली अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जमीन नापेर राहिल्यास त्या क्षेत्रालाही विमा संरक्षण मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत शेततळ्यासाठी मिळणारे अर्थसहाय्य.

राष्ट्रीय कृषि विकास या योजनेंतर्गत संरक्षित सिंचन सुविधासाठी विविध आकारमानाच्या शेततळे बनवण्यासाठी किमान १५ x १५ x १५ मीटर एवढ्या आकाराच्या शेततळ्यासाठी २८ हजार २७५ रुपये व कमाल ३० x ३० x ३० मीटर या आकाराच्या शेततळ्यासाठी ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादित अनुदान भेटत आहे. कृषी सिंचन योजनेंतर्गत ही वरील प्रमाणे निर्धारित रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

४३६ रुपये भरा आणि मिळवा २,००,०००/- रुपये.



मोठ्या आकाराच्या शेततळ्यासाठी जास्तीत जास्त रक्कम ७५ हजार रुपये इतके अनुदान देण्याबाबत.

या योजने अंतर्गत विविध आकारच्या असणाऱ्या शेततळ्या पैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याकरिता मागणी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर करता येईल. यामध्ये जास्तीत जास्त ३४ x ३४ x ३ मीटर व कमीत कमी १५ x १५ x ३ मीटर या आकाराचे  इनलेट आऊट लेटसह किंवा इनलेट आऊटलेट हे  विरहित शेततळे घेता येणार असून शेततळ्याच्या आकारानुसार अनुदानाची जास्तीत जास्त रक्कम ही ७५ हजार इतकी असणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेंतर्गत , गांडूळ खत युनिट, बांबू लागवड,फळबाग लागवड,नाडेप कंपोस्ट युनिट बनवणे, इतर लाभ दिले जातात.

पीक विमा योजना : फक्त १ रुपयात पीक विमा योजना | आजच आपले नाव नोंदवा.



फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या २ योजना आहेत. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवड करण्यासाठी पात्र ठरु शकत नाहीत,अश्या शेतकऱ्यांसाठी सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना उपलब्ध असून किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र असणारे शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात. यामध्ये फळपिके, आंब्याची कलमे व रोपे, पेरुची कलमे व सधन लागवड, डाळींबची कलमे, कागदी लिंबु, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर, चिक्कु, मोसंबी, संत्री इत्यादी पिकांची लागवड ही एका निर्धारीत अंतरावर लागवड केल्यास संबंधीत शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत अनुदान मिळणार आहे.

कृषी यांत्रिकीकरणासाठी मिळणारे अनुदान.

ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर सोबत चालणारी औजारे, ठिबक आणि तुषार सिंचन सेट, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ,प्लास्टिक मल्चिंग इत्यादी गोष्टीनसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केल्यास त्यांना या योजनेचा देखील लाभ घेता येईल.

५०% गाय - म्हैस गट वाटप अनुदान योजना २०२३-२४ | Gai mhais gat vatap yojana 2023-24



शेती व शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना.

  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुग्रह अनुदान योजना, 
  • हवामान आधारित फळपिक विमा योजना,
  • ५०% म्हैस-गाय गट वाटप अनुदान योजना.
  • सर्वसमावेशक पिक विमा योजना, 
  • PM किसान योजना, 
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, 
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत पीक प्रात्यक्षिके योजना,

शेतीसाठीचे लागणारे बी -बियाणे, पंप मोटर आणि पाईप इत्यादीसाठी अनुदानाच्या अनेक योजना ह्या कृषि विभागामार्फत राबविल्या जातात. या योजनांबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक पातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क केल्यास या योजनांविषयी माहिती व संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येते.
👇ही योजना देखील बघा👇

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना👉(Click here)

 

वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.