Type Here to Get Search Results !

Junnar Breaking News: जुन्नर एसटी बसमधील भांडण आणि मारहाण प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल !

जुन्नरमध्ये एसटी बसमधील भांडणाचा राग मनात धरून मजूर पती-पत्नीवर हल्ला आणि विनयभंग; पाच जणांवर गुन्हा दाखल ! 

Junnar Breaking News

Junnar Breaking News: एसटी बसमधील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील मजूर पती-पत्नीवर घरात घुसून हल्ला केला आणि त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पवन चंद्रकांत लोखंडे यांनी या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रामा साबळे, अतुल साबळे, सूरज साबळे (रा. रामवाडी-पारुंडे), रोहन फुले आणि महेश वाजे (रा. चिंचोली काशीद) यांनी एसटी बसमधील भांडणाचा राग मनात धरून लोखंडे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर बेदम मारहाण केली. यानंतर त्यांनी पत्नीचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींवर कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२४, ३५४, ४५२, ५०२ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.सी.पवार करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सांगलीत १६ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा जप्त !👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.