Type Here to Get Search Results !

कल्याण-नगर महामार्गावर डुंबरवाडी (जुन्नर) येथे तिहेरी अपघात; टेम्पो चालक जखमी ! Junnar Kalyan Nagar Highway Triple Accident

Junnar Dumbarwadi Triple Accident News: कल्याण-नगर महामार्गावरील डुंबरवाडी (जुन्नर) येथील माऊली हॉटेलजवळ शुक्रवार (दि. १० मे) सकाळी १०.३० सुमारास ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात टेम्पोचा चालक जखमी झाला असून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Junnar Kalyan Nagar Highway Triple Accident


याबाबत सविस्तर बातमी असे आहे की, आळेफाट्याहून ओतूरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओला (एमएच १४ ईवाय ८४२६) ओतूरहून आळेफाट्याकडे जाणाऱ्या कारने (एमएच १४ बीएक्स ८००८) धडक दिली. त्यानंतर कार एका टेम्पोला (एमएच १४ डीएम ९००८) धडकली. टेम्पो चालक सुरेश तुकाराम शिंदे (रा. आळे, जि. जुन्नर) हे जखमी झाले. त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या तिहेरी अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.अपघाताचे कारण मात्र समजू शकले नाही.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरुरकर, पोलीस हवालदार विलास कोंढवळे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

२६/११ सारखा दहशतवादी हल्ला, रशिया हादरलं.४० नागरिक ठार १०० हून अधिक जखमी ?👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.