रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
Moscow Terror Attack Breaking News: मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ISIS (Terror group Islamic State) ने स्वीकारली आहे. मात्र, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशियन प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, मॉस्को (MOSCOW) मधील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये पाच बंदूकधारी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला, ज्यात किमान ४० लोकांचा मृत्यू आणि १०० हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला ०९ मे रोजी रात्री ८ वाजता घडला.
TASS वृत्तसंस्थेनुसार, पोलीस लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हल्ल्यानंतर कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागली आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.RUSSIA NEWSमॉस्कोमधील विशेष दल घटनास्थळी पोहोचले आहे आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कारवाई करत आहे. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले आहे.
कॉन्सर्ट हॉलमध्ये शेकडो लोक अडकून पडल्याची भीती असल्याने ७० हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात आहेत आणि जखमींना त्वरित उपचारासाठी नेण्यात येत आहे.पाच बंदूकधारी दहशतवाद्यांनी हॉलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आग लावल्याचे वृत्त आहे. हल्ल्याची जबाबदारी ISIS दहशतवादी गटाने स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
केनियात पूर: २४ ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान, ५ हजार जनावरांचा मृत्यू?👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



