Kenya Flood Breaking News: केनियामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशातील २४ ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि ५ हजार जनावरे वाहून गेली आहेत.
काल म्हणजेच बुधवारी दि ०८ मे रोजी संदयकाळी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी नैरोबीतील अनेक रस्त्यांवर पूर आला. वाहने वाहून गेली आणि अनेक लोक अडकून पडले. प्रशासनाने अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू केले आहे.किनारपट्टीचे शहर मोम्बासा आणि ईशान्येकडील मंदेरा आणि वजीर या शहरांना सर्वाधिक अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे.
सरकारी अधिकारी आणि केनिया रेड क्रॉसच्या मते, पुरामुळे नैरोबी आणि आसपासच्या हजारो घरांमध्ये पाणी शिरले आहे. एपी न्यूजनुसार, या पूरामध्ये ७० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १५ हजाराहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.केनिया हा आफ्रिकेतील प्रमुख शेतीप्रधान देश आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बचाव कार्य सुरू आहे आणि अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.पूरग्रस्त लोकांना मदत पुरवण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून मदतकार्य सुरू आहे.पूरमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे.
या पुरामुळे केनियातील लोकांवर मोठा परिणाम झाला आहे. मदतकार्य आणि पुन्हा बांधणीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत आवश्यक आहे.
पिंपळवाडी (ता. जुन्नर) मध्ये शेतात ऊसतोडणी करताना बिबट्याचा हल्ला ?👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



