Type Here to Get Search Results !

Junnar : जुन्नर मध्ये चोरट्यांनी २ घरे फोडली; ११ ताळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास !

वडगाव आनंद मधील चोरी: सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास ! 

Junnar Gharfodi Breaking News

Junnar Gharfodi Breaking News: वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील दोन बंद घरांमधून चोरट्यांनी सोने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी (५ मे) दुपारी घडली. या घटनेत ११ तोळे सोने आणि ३ लाख ५७ हजार रुपये चोरीला गेले आहेत.

मारुती गाडगे हे कुटुंबासह मुक्ताई माळ येथील शेतात कामावर गेले होते. ते सायंकाळी कोथिंबीर विकण्यासाठी आळेफाटा येथे आले असताना त्यांना शेजारी राहणाऱ्या महिलेकडून घरी चोरी झाल्याची माहिती मिळाली. घरी परत येऊन त्यांना कपाटातील ७ तोळे सोने आणि २ लाख ८५ हजार रुपये चोरीला गेले असल्याचे दिसून आले.मारुती भिकाजी गाडगे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

दुसऱ्या घरातही चोरी:

याच गावात पादीरवाडी येथे राहणाऱ्या गोपीनाथ शिंदे यांच्या बंद घरातही चोरी झाली. चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील ४ तोळे सोने आणि ७२ हजार रुपये चोरी केले. याप्रकरणी शिंदे यांनीही फिर्याद दिली आहे.

तपास सुरू:

आळेफाटा पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी घटनास्थळी भेट दिली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.

माळशेज घाटात भीषण अपघात !! 👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.