Malshej Ghat Accident | माळशेज घाटात भीषण अपघात! ट्रक-दुध टँकर अपघातात ४ ठार, ३ वर्षांचा मुलगा जखमी !
Junnar Malshej Ghat Accident Breaking News: माळशेज घाटातील आवळ्याची वाडीजवळ आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास दुधाचा टँकर आणि मालवाहू ट्रकमध्ये भयानक अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पती-पत्नी हे जुन्नर तालुक्यातील पांगरी गावचे रहिवासी होते.ते आपल्या ३ वर्षांच्या मुलासोबत टेम्पोने प्रवास करत होते. दुसरीकडे, मालवाहू ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता.आवळ्याची वाडीजवळ अचानक दोन्ही वाहनांचा धडक झाला.यात टेम्पोमधील पती-पत्नी आणि एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.
या अपघातात अक्षय शांताराम दिघे (वय ३३), तेजल अक्षय दिघे (वय २६, रा. पांगरी), टँकर चालक दत्तात्रय किसन वामन (रा. पिपळवंडी) आणि टेम्पो चालक शकील अमजत शेख (रा. जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ३ वर्षांचा आरुष अक्षय दिघे (वय ३) जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झाली नाहीत पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे.
जुन्नर एसटी बसमधील भांडण आणि मारहाण प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल! 👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



