Junnar Pimpalwadi Young Girl Injured In Leopard Attack: बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पिंपळवाडी येथील तोतर बेट मळ्यात ऊसतोडणी सुरू असताना एका १८ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात रितू श्यामराव गागुर्डे (वय १८, मुळगाव - चाळीसगाव) ही जखमी झाली आहे.
सविस्तर घटनेची माहिती अशी आहे की, सूर्यकांत सखाराम तोतरे यांच्या शेतात मंगळवारी ऊसतोडणी चालू होती. यावेळी रितू ऊसतोडणी कामगारांसोबत काम करत होती. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने रितूवर हल्ला केला. रितूवर हल्ला झाल्याने आसपासच्या कामगारांनी आरडाओरड केली आणि त्यामुळे बिबट्या पळून गेला.
या हल्ल्यात रितूच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर नख्यांनी जखमा झाल्या आहेत. तातडीने रितूला उपचारासाठी पिंपरीपेंढार येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी तातडीने घटनास्थळी आळे वनपरिक्षेत्रेचे वनपाल संतोष साळुंखे, वनसेवक बी के खर्गे आणि रोशन नवले यांना घटनास्थळी पाठवले. या हल्ल्यानंतर सध्या या ठिकाणची ऊसतोडणी कामे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.
वनविभागाकडून नागरिकांना सावधगिरीचा इशारा:
वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि रात्री उशिरा बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, जंगलात जाताना नेहमी गटात जाण्याचा आणि जंगलात जास्त वेळ न थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री ? 👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



