Type Here to Get Search Results !

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना मिळणार २५ लाख रूपये, राज्यशासनाचा मोठा निर्णय | Sarkari Yojana Maharashtra

Sarkari Yojana


वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास किंवा गंभीर व किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत भरीव वाढ करण्यात आली आहे. या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत केली.

मुनगंटीवार यांनी याबाबतचे निवेदन सादर करताना सांगितले की, राज्यात वन्य प्राण्यांची संख्या वाढली असून, मानव-वन्यजीव संघर्षातही वाढ झाली आहे. हा संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागामार्फत जनजागृती करण्यात येत असून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजनेंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.

जाणून घेऊया सविस्तर माहिती खालील प्रमाणे.  


वाघ, बिबट्या, अस्वल, गवा (बायसन ), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हाळ, मगर, हत्ती, जंगली कुत्रा (ढोल), रोही (निलगाय) आणि माकड/वानर यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू, कायमचे अपंगत्व, गंभीर दुखापत, किरकोळ जखमा. जखमींच्या वर्गवारीनुसार संबंधितांना आर्थिक मदत दिली जाते. अनेक वेळा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य मृत्यू होत नाही परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात.जखमी व्यक्तीला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व त्याला प्रथम शासकीय रूग्णालयात नेऊन व्यक्तीचे प्राण वाचावेत यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. काही वेळा पुरेशी संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते आणि अशा वेळ प्रसंगी जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते.

सदर मृत व्यक्ती, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तींना देण्यात येणारी सध्याची आर्थिक मदत तुलनेने कमी असून त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या. जनप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याच्या मागणीच्या अनुसरुन,वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, कायमचे अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ दुखापत झाल्यास देण्यात येणारी आर्थिक मदत/खर्च या रकमेत पुढीलप्रमाणे वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. .

वाघ, बिबट्या, अस्वल, गाय (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, जंगली कुत्रा (ढोल), रोही यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू / कायमचे अपंगत्व / गंभीर दुखापत /(निलगाय) आणि माकड/वानर ह्यांच्या हल्यात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास खालीलप्रमाणे अर्थसहाय्य / खर्चाची प्रतिपूर्ती खालीलप्रमाणे प्रदान करावी. 

सदर व्यक्तीचा मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व किंवा गंभीर दुखापत झाल्यास पुढील रक्कम आर्थिक मदत द्यावी.


तपशिल आणि व्यक्ती मृत झाल्यास देय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम खालील प्रमाणे.

१. व्यक्ती मृत झाल्यास. 

  • देय अर्थसहाय्याची रक्कम रुपये २०,००,०००/- रु.१०,००,०००/-(केवळ दहा लाख रुपये) तात्काळ धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्कम रु. १०,००,०००/- (केवळ दहा लाख रुपये) त्यांच्या मासिक व्याजासह राष्ट्रीयीकृत बँकेतील संयुक्त खात्यात. रक्कम (फिक्स डिपॉझिट) जमा करावी.

२. व्यक्ती कायम अपंग झाल्यास. 

  • देय अर्थसहाय्याची रक्कम रुपये ५,००,०००/-

३. व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास. 

  • देय अर्थसहाय्याची रक्कम रुपये १,२५,०००/-

४. व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास. 

  • देय अर्थसहाय्याची रक्कम औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा.परंतु खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे हे महत्त्वाचे असल्यास त्याची मर्यादा रुपये २०,०००/- (रु. वीस हजार फक्त) प्रती व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.

पशुधन मृत्यू/अपंग/जखमी प्रकरणी द्यावयाची नुकसान भरपाई.

पशुधनाचे नाव (पाळीव प्राणी). देय भरपाईची रक्कम खालीलप्रमाणे आहे. 


१. गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यु झाल्यास. 

  • बाजार भाव किंमतीच्या ७५% किंवा रु. ७०,०००/- (रु. सत्तर हजार) यापैकी जी कमी असणारी रक्कम.
२. मेंढ्या, शेळ्या आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास* {* वन्यजीव (संरक्षण) (रु. पंधरा हजार फक्त) अधिनियम, १९७२ यापैकी जी रक्कम कमी असेल. (१८ -अ) प्रमाणे दिली जाणार }

  • बाजारभावाच्या ५०% किंवा रु. १५,०००/- (रु. पंधरा हजार) यापैकी जी कमी असलेली रक्कम.

३. गायी, म्हशी, बैल या जनावरांना कायमचे अपंगत्व आले तर.

  • भाव किंमतीच्या ५०% किंवा रु. १५,०००/-(रु. पंधरा हजार फक्त) यापैकी जी कमी असलेली रक्कम.

४.गाय, म्हैस, बैल, मेंढ्या, शेळी व इतर पशुधनाला इजा झाल्यास.
 
  • वैद्यकीय उपचारासाठी येणारा खर्च हा देण्यात यावा. औषधोपचार शासकीय जिल्हा परिषद पशुवैद्यकीय रुग्णालयात करावे. देय रक्कम मर्यादेच्या बाजारभावाच्या २५% किंवा रु. ५०००/- (रु. पाच हजार) प्रति जनावर यापैकी जी रक्कम कमी असेल, ती भरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे दिली जाईल.

मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणारी रक्कम. 

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना देय आर्थिक मदतीच्या रकमेपैकी रु. १०,००,०००/- (रु. दहा लाख) तात्काळ धनादेशाद्वारे प्राप्तकर्त्याला आणि उर्वरित रक्कम रु. १०,००,०००/-(रु. दहा लाख फक्त) रु. ५.०० लाख मुदत ठेवीमध्ये ५ वर्षांसाठी ठेवावेत आणि उर्वरित ५.०० लाख १० वर्षांसाठी मुदत ठेवीमध्ये ठेवावेत. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल.



वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे :

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मानवी नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य/नुकसान भरपाईसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास, प्रथम तुम्हाला खालील वन विभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर जावे लागेल.

https://intranet.mahaforest.gov.in/forestportal


महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल विविध RTS अर्ज आणि सेवा दिसतील ज्यामधून तुम्हाला "वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधनाच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मंजूर करणे" किंवा "वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य मंजूर करणे" या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 


RTS अर्ज 

अर्जदार आणि नुकसान भरपाईची माहिती, तसेच आवश्यक तपशील/कागदपत्रे जोडून वरील RTS अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा. अर्ज भरल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक मेसेज येईल व वनविभागाचे अधिकारी नुकसानीचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल.


अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील उप-वनसंरक्षक/उपविभागीय अधिकारी/वनक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


👇ही योजना देखील बघा👇

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या कृषि विभागाच्या विविध योजना👉(Click here)

वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.