Type Here to Get Search Results !

Madh Kendra Yojana Maharashtra 2023 | मध केंद्र योजना महाराष्ट्र २०२३

Madh Kendra Yojana Maharashtra -मध केंद्र योजना महाराष्ट्र 2023

Madh Kendra Yojana Maharashtra 2023

Madh Kendra Yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध सरकारी योजना राबवते. त्यापैकी एक योजना म्हणजे मध केंद्र योजना. ही योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही त्यांच्या उपजीविकेच्या साधनासाठी  शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती व्यवसाय अधिक-अधिक फायदेशीर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते.त्यापैकी एक फायदेशीर योजना म्हणजे मधमाशी पालन योजना,या मधमाशांमुळे शेतीचे उत्पन्न वाढते म्हणून मध उद्योगाला अधिक चालना देण्याची गरज आहे. मध उद्योग हा केवळ शेतीपुरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून न ठेवता मुख्य उद्योग बनविल्यास ग्रामीण रोजगार निर्मितीला चालना मिळेल. मधमाशांच्या मधपेट्या शेती पिकांजवळ आणि फळबागांजवळ तसेच जंगलात ठेवल्यास पिकाच्या प्रकारानुसार पीक उत्पादनात ५ ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता असते. ही वाढ मधमाशांनी उत्पादित केलेल्या मध आणि मेणाच्या किंमतीपेक्षा १० ते १५ टक्के अधिक आहे.

मधमाशी पालन हा एक  वैशिष्टयपूर्ण बहुउद्देशीय उद्योग आहे. मध संकलन, परागकणांचे संकलन, मधमाश्यांच्या वसाहतींची संख्या वाढविणे, या उद्योगातून उप उत्पादनांचे संकलन, तसेच मराठवाड्यातील तेलबिया पिके आणि पश्चिम घाट व विदर्भातील वनक्षेत्र, कोकण विभागातील जंगले आणि फळबागाचे क्षेत्र अशी वैविध्य पूर्ण निसर्ग संपदा असलेल्या राज्यात विविध नैसर्गिक संसाधने आहेत. विकासाला मोठा वाव आहे. त्या संदर्भात, मधमाशीपालन उद्योग हा उक्त उद्दिष्टांशी सुसंगत उद्योग असल्याने, मधमाशीपालन  उपक्रमास उद्योग म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.

मध केंद्र योजना काय आहे ? याबद्दल सविस्तर महिती जाणून घेणार आहोत. 

१. मध केंद्र योजना कोण राबवणार आहे ? - महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ

२. योजनेची व्याप्ती –

  • सदर योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे.
  • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापन करण्यात आली आहे.

३. या योजनेचे काय फायदे असतील ?

  • साहित्याच्या स्वरूपात ५०% अनुदान,
  • मोफत मध उद्योग शासकीय प्रशिक्षण
४. विशेष बाब -

  • शासकीय प्रशिक्षण मोफत दिले जाईल.
  • सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल.
  • ग्रामीण भागात आर्थिक संधी उपलब्ध होतील.

५. महत्वाचे -

  • लाभार्थ्यांना कुठे प्रशिक्षण द्यायचे हे ठरवण्याचे संपूर्ण अधिकार सदर मंडळाला असतील.
  • प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी मध केंद्र सुरू करणाऱ्या मंडळाला एक बाँड द्यावा लागतो.
६. अधिक माहितीसाठी संपर्क -

  • महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर, जि. सातारा. 
  • प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय
७. संपर्क क्रमांक -
  • ०२१६८-२६०२६४
  • तसेच अधिक माहितीसाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची अधिकृत वेबसाईट पहा.

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची अधिकृत वेबसाईटसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. 



खादी आणि ग्रामोद्योग मंडळ.


मध केंद्र योजनेचे फायदे | Madh Kendra Yojana Maharashtra Benefits. 

१. मध केंद्र या योजने अंतर्गत आपल्याला स्वतःचे मध केंद्र सुरु करण्यासाठी राज्यातील शेतकरी, मधपाळ तसेच इच्छुक तरुण/तरुणीस महाराष्ट्र राज्य शासनाकडून योजनेच्या खर्चाची ५० टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपात देण्यात येते.

२. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.

३. मध केंद्र योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या नव नवीन संधी उपलब्ध होतील.

४. या योजनेंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वत:चा स्वयंरोजगार उभारता येईल जेणेकरून त्यांना नोकरीसाठी भटकंती करण्याची गरज भासणार नाही.

५. मध केंद्र योजनेच्या मदतीने राज्यातील बेरोजगारी कमी होईल.

६. राज्यातील तरुण/तरुणी सशक्त व आत्मनिर्भर बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम होतील

७. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वत:चा स्वयंरोजगार सुरू करता येईल आणि राज्यातील इतर बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील.

८. मध केंद्र योजनेच्या मदतीने शेतकरी त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवू शकतील. 

९. मध केंद्र योजनेंतर्गत, महाराष्ट्र शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते, त्यामुळे शेतकरी, मधमाशीपालन, तरुण/तरुणी यांना कोणाकडूनही कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.

१०. या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकरी वर्ग, मधपाळ आणि बेरोजगार तरुण/तरुणी यांचा आर्थिक विकास होईल.

११. या योजनेच्या मदतीने शेतकऱ्याचे जीवनमान सुधारून त्याचे भविष्य उज्ज्वल होईल.


मध केंद्र योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Required Documents for Madh Kendra Yojana. 

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा.
  • अर्जदारचा आधार कार्ड. 
  • अर्ज दाराचे नाव असलेले रेशन कार्ड.
  • निवास प्रमाणपत्र. 
  • शिक्षण प्रमाणपत्र. 
  • मोबाईल नंबर. 
  • ई - मेल आयडी.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स. 
  • मधमाशी पालन प्रमाणपत्र असल्यास किंवा नसल्यास. 


मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत | Madh Kendra Yojana Application Process.


  • सर्व प्रथम अर्जदाराने त्याच्या जिल्हा कार्याल येथे जावे लागेल.
  • तुमच्या जिल्हातील खादी व ग्रामोद्योग केंद्र कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
  • अर्जामध्ये ही काही माहिती विचारलेली आहे ती सर्व भरा आणि आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती अर्जाला जोडा.
  • सदर भरलेला अर्ज तुमच्या जिल्हातील खादी व ग्रामोद्योग कार्यालयात जमा करावा लागतो.
  • हे या योजनेअंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करेल.


👇ही योजना देखील बघा👇



वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.