कर्मचाऱ्यांचे सॅलरी अकाउंटचे असंख्य फायदे ! जे बँकाही सांगत नाहीत आणि १०% लोकांनाच माहिती.
Salary Account Benefits And Information
Salary account: पगार खाते (Salary account) ह्याचा आज अभ्यास करूया, पगार खाते म्हणजेच सॅलरी अकाउंट धारक असलेले सरकारी आणि निमसरकारी कर्मच्यारी असलेल्या केवळ १०% लोकांनाच त्याचे फायदे माहित असतील. चला तर आपण या सॅलरी अकाऊंट चे काय काय फायदे आणि विविध प्रकार सविस्तर माहिती पाहूया.
राज्य सरकारचे वेतन पॅकेज (State Government salary package)
Salary account पगार खात्याचे एकूण ९ प्रकार आहेत. त्यापैकी SGSP खात्याचे (account) ४ प्रकार आहेत.या प्रत्येक प्रकारांमधील फरक कर्मचाऱ्यांच्या पदनाम(Designation) आणि निव्वळ मासिक उत्पन्नावर(Net monthly income)आधारित आहे.
SGSP खात्याचे ४ प्रकार.
- प्लॅटिनम :- ज्या कर्मचाऱ्यांचे एकूण मासिक वेतन हे १ लाख किंवा त्याहून अधिक आहे,अशांना बँकेकडून प्लॅटिनम खात्याची ऑफर दिली जाते.
- डायमंड :- सॅलरी अकाउंट खात्याचा ह्या प्रकारात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बँकेकडून डायमंड खात ऑफर केला जातो, ज्यांचे मासिक वेतन हे रु.५०,००१ ते रु.१,००,००० लाख दरम्यान आहे.
- गोल्ड :- सॅलरी अकाउंट चा लाभ ह्या प्रकारात २० हजार ते ५० हजार दरम्यान मासिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेकडून गोल्ड खात दिला जातो.
- सिल्व्हर :- सॅलरी अकाउंट चा लाभ ह्या प्रकारात रु.५,००० ते रु.२०,००० हजार दरम्यान पगार आहे.अशा कर्मचाऱ्यांना बँकेकडून सिल्व्हर खात्याचा लाभदिला जातो.
CSP खाते प्रकार (CSP Account Types)
निमसरकारी सॅलरी पॅकेज प्रकारातल्या पगार खात्याची पात्रता कर्मचाऱ्यांच्या निव्वळ मासिक वेतनावर अवलंबून आहे.
- प्लॅटिनम : वरील १,००,०००/-
- डायमंड : ५०,०००/- च्या वर आणि १,००,०००/- पर्यंत.
- गोल्ड : २५,०००/- च्या वर आणि ५०,०००/- पर्यंत.
- सिल्व्हर : १०,०००/- दरम्यान आणि २५,०००/- पर्यंत.
What is Employees Gratuity | ग्रॅच्युटी म्हणजे काय ?
सॅलरी अकाउंटचे काय आहेत फायदे ?
- तुम्हाला ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते.आपल्या सॅलरी अकाउंटला शिल्लक नसतानाही तुम्ही २ पगाराइतके पैसे काढू शकता.
- सॅलरी अकाऊंटसोबत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड देखील बँकेकडून ऑफर केले जाते . याशिवाय चेक आणि डिजिटल बँकिंगचे सर्व फायदेही सदर बँक उपलब्ध करून देते.
- तुमचे सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्हाला लॉकर सुविधेवर २५% सूट बँकेकडून ऑफर केले जाते.
- सॅलरी अकाऊंट सोबत, हे तुम्हाला डिमॅट अकाउंटची सुविधा देखील देते, ज्याचा फायदा घेऊन तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता.
- सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. बँक कर्ज प्रक्रिया शुल्कावर ५०% सूट देखील देते.
- बँक आपल्या सॅलरी अकाऊंट ग्राहकांना विमा लाभ देखील देते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- तुमच्या पगारानुसार बँकेकडून ३० लाख रुपयांपर्यंत विमा कव्हरेज भेटू शकतो.
- तुमचे सॅलरी अकाऊंट असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेच्या एटीएममधून(ATM) तुम्हाला हवे तितक्या वेळा मोफत पैसे काढू शकता.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे शून्य शिल्लक असतानाही पगार खाते उघडता येते. शिल्लक शून्यावर गेल्यास तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- जर तुमचा मासिक पगार २५ हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एसबीआयमध्ये खाते देखील उघडू शकता. अशा सॅलरी अकाऊंट ग्राहकांसाठी एसबीआय रिश्ते योजना खूप उपयुक्त आहे.
सॅलरी अकाऊंट कोण उघडू शकते खाते ?
सरकारी व खाजगी नोकरी करणारा कोणताही भारतीय नागरिक, केलेल्या कामा बदल्यात दरमहा किमान १० हजार रुपये कमवत आहे, तो सॅलरी अकाऊंट उघडू शकतो.
तुम्ही SBI सॅलरी अकाऊंट हे ऑनलाइन देखील उघडू शकता.यासाठी तुम्हाला एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.किवा तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये योनो एप डाउनलोड करून देखील सॅलरी अकाऊंट उघडू शकता पण एकदा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बॅंक शाखेत जावे लागते.
कर्मचाऱ्यांचे पगार खाते कोणत्या बँकेत असावे? यासंदर्भात शासनाचा कोणताही शासन निर्णय नाही किंवा महाराष्ट्र शासनाने देखील असा कोणता निर्णय काढलेला नाही.प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना कोणत्याही बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट उघडता येऊ शकते.
सूचना: वरील सदर दिलेली सर्व माहिती ही प्रतेक बँकेची वेग वेगळी नियम अटी शर्तीसह असू शकते.
👇हे देखील वाचा 👇
What is Employees Gratuity ? ग्रॅच्युटी म्हणजे काय ?👉(Click here)
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




