Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in Marathi.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ठाण्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे बांधकाम सुरू असलेल्या पुलावर भीषण दुर्घटना घडली. काल रात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन कोसळून १५ जणांचा जागीच मृत्यू झाल्या भीती आहे. तर २ जन जखमी आहेत.अंधार असल्याने नेमके किती जण ढिगाऱ्याखाली अडकल्या भीती आहे. पुलावरील गर्डर जोडणारे क्रेन साधारण १०० फुटांवरून खाली खाली उभ्या असलेल्या इंजिनिअर्स व कामगारांवर कोसळले. मृतांमध्ये ६ इंजिनिअर्सचा व इतर कामगारांचा समावेश आहे. घटनास्थळी २ एनडीआरएफचे टीम बचाव व शोधकार्य करत आहेत. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली एकूण २६ जण अडकल्याची भीती व्यक्त केली आहे.घटनास्थळी NDRF टीम बचावकार्य करत आहे.
दादा भुसे यांनी दिली दुर्घटनास्थळी भेट.Samruddhi Mahamarg Thane Accident News.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ठाण्यातील शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे बांधकाम सुरू असलेल्या पुलावर भीषण दुर्घटना घडली आहे. पुलावरील गर्डर जोडणारे क्रेन १०० फुटांवरून खाली कोसळले. यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. रात्री अंधार असल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले आहेत. रात्रीच घटनास्थळी मंत्री दादा भुसे यांनी भेट दिली व घटनेचा आढावा घेतला. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
PMNRF कडून २ लाख रुपयांची मदत जाहीर.Samruddhi Mahamarg Thane Accident News.
ठाण्यातील दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या अपघातात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केला. तसेच प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपयांची व जखमींना ५०,००० रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.
👇हे देखील वाचा👇
एक्स्प्रेसमध्ये गोळीबार👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |





