Brazil Plane Crash: 12 passengers, 2 crew members dead as plane crashes in Brazil’s Amazon.
Plane Crash In Brazil
ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये शनिवारी विमान अपघात झाला असून त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ऍमेझॉन राज्याची राजधानी असलेल्या मनौस पासून ४०० किमी अंतरावर असलेल्या बार्सेलोसला जाणारे हे छोटे प्रॉपेलर विमान होते. प्रवास संपण्याच्या काही वेळापूर्वीच विमान दुर्घटनाग्रस्त झाले. तेथील पोलिस अधिका-यांनी सांगितले की, विमानात एकूण १२ प्रवासी आणि २ क्रू सदस्य आसे एकूण १४ प्रवासी होते.या दुर्घटनेत १४ ही प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ब्राझील आणि अमेरिकेतील प्रवाशांचा समावेश आहे. सर्व प्रवासी बार्सिलोनामध्ये मासेमारी करून पुन्हा येत होते.हा अपघात कसा झाला याचे कारण शोधण्यासाठी चौकशी ब्राजील सरकारने तत्काळ एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
खराब हवामान ठरले अपघाताचे कारण!
ऍमेझॉन राज्याचे सुरक्षा सचिव विनिशियस आल्मेडा यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीवरून असे दिसून आले आहे की बार्सेलोसमध्ये पावसामुळे आणि खराब हवामान व दाट धुक असल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि नंतर क्रॅश झाले. ब्राझिलियन न्यूज वेबसाईट G-1 ने रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, अपघातात सामील झालेले विमान EMB-110 आहे, जे ट्विन इंजिन असलेले विमान आहे. या विमानाची निर्माता ब्राझीलची कंपनी आहे.


Aero-Taxi airline चे होते विमान.
सेंटर फॉर रिसर्च अँड प्रिव्हेंशन ऑफ एरोनॉटिकल अपघातांनी पुष्टी केली आहे आणि म्हटले आहे की Seripa VII ला या अपघाताचा अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. हे विमान मनु-आस, एरो-टॅक्सी एअरलाइनचे होते. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांमध्ये अनेक अमेरिकन आणि ब्राझीलियन नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. अपघातात ठार झालेल्यांची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



