Pune Midnight Murder In Pune One Dead
रविवारी मध्यरात्री खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले. खडकी पोलीस (Pune) स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला.
मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिल साहू (वय अंदाजे ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुण्यात मध्यरात्री भयंकर घटना घडली खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला आहे. अनिल साहू असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल साहू गाढ झोपेत असताना एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि घरात शिरुन त्या व्यक्तीने अनिल साहूवर एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या.हल्लेखोर पसार झाल्यानंतर अनिल साहू यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी अनिल साहू यांनी तपासलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दुर्दैवानं अज्ञात हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे अनिल साहुचा आधीच मृत्यू झाला होता.याप्रकरणी आता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


