Type Here to Get Search Results !

Prakash Shendge Jat pattern offer to Vishal Patil : ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा विशाल पाटलांसमोर नवा प्रस्ताव, सांगलीच्या राजकारणातील 'जत पॅटर्न' नेमका काय ?

Prakash Shendge Jat pattern offer to Vishal Patil in Sangli politics: शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील नाराज आहेत. प्रतीक पाटील यांनी आता प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली आहे.

Prakash Shendge Jat pattern offer to Vishal Patil

Jat pattern offer to Vishal Patil in Sangli politics: सांगली मतदारसंघावर विशाल पाटील काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले असतानाच ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी विशाल पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नचा प्रस्ताव ठेवला आहे. विशाल पाटील यांचा भाऊ प्रतीक पाटील मला भेटायला आला आणि मी त्यांना जत पॅटर्न राबविण्याचा प्रस्ताव दिला, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. आता याबाबत विशाल पाटील काय भूमिका घेतात आणि जत पॅटर्न नेमका काय आहे ते बघूया.

उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांची नाराजी

महाविकास आघाडीची नुकतीच बैठक झाली असून या बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असलेले विशाल पाटील नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनीही थेट केंद्रीय नेतृत्व सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र केंद्रीय नेतृत्वाने सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाला दिल्याने विशाल पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील असलेले विश्वजित कदमही अपयशी ठरल्याचे दिसून आले.

प्रतीक पाटलांच्या देखील भेटीगाठी सुरू..

एकीकडे सांगलीची जागा न मिळाल्याने विशाल पाटील नाराज असल्याचे समोर आले, तर दुसरीकडे त्यांचे बंधू प्रतीक पाटील हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी अकोल्यात गेले. त्यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची त्यांच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन भेट घेतली. या दोन बड्या नेत्यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी प्रतीक पाटील यांनी केल्याची माहिती आहे.

प्रकाश शेंडगे यांचा जत पॅटर्न

प्रकाश शेंडगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शेंडगे यांनी पाटील यांच्यासमोर जत पॅटर्नचा प्रस्ताव मांडला. पुन्हा एकदा वसंतदादा पाटील कुटुंब आणि शेंडगे कुटुंब एकत्र आल्यास सांगली लोकसभेसह सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था नक्कीच ताब्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेमका काय आहे जत पॅटर्न?

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची हक्काची विधानसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला. त्यावेळी नाराज झालेल्या काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे प्रकाश शेंडगे निवडून आले. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडे सेनेचे केडर नसल्याने त्यांना मतदान केले जाणार नाही, असे शेंडगे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विशाल पाटील यांनी मला पाठिंबा द्यावा, आगामी सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.

२०१४ मध्ये विशाल पाटील यांच्या विनंतीवरूनच संजय काका पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सांगली जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या मदतीने ते सलग दोन वेळा भाजपचे खासदार होत आहेत. एकूण काय तर वसंतदादा पाटील कुटुंबाला हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विशाल पाटील आता काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सांगली तालुका काँग्रेस कमिटी बरखास्तीचा ठराव👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.