Give two helmets when selling a 2 wheeler. Otherwise, action will be taken against the showroom operator.
२ व्हीलर विक्री करताना शोरूम चालकांनी ग्राहकाला दोन हेल्मेट देणे हे आरटीओ च्या नियमानुसार बंधनकारक आहे. आरटीओचे तसे निर्देश देखील आहेत. शोरूम चालक हे ग्राहकांला २ व्हीलर विक्री करताना मात्र एकच हेल्मेट देत आहेत. ग्राहकांना २ व्हीलर खरेदी केल्या नंतर जर दोन हेल्मेट मिळत नसतील तर त्यांनी त्याची तक्रार आरटीओला करावी, असे आरटीओ अधिकारी स्वता विनोद साळवी यांनी सांगितले आहे.
आरटीओच्या नियम आणि निर्देशानुसार २ व्हीलर शोरूम चालकांनी ग्राहकांना दोन हेल्मेट देणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, जर आपण २ व्हीलर खरेदी केल्यानंतर शोरूम चालकांनी दोन हेल्मेट दिली नाहीत, तर नागरिकांनी थेट आरटीओ कार्यालयात तक्रार करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित शोरूम चालकावर कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे आपण २ व्हीलर खरेदी करताणी आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे.
*दोन हेल्मेट देणे बंधनकारक*
शहर,जिल्ह्या आणि तालुक्यातील शोरूममध्ये २ व्हीलर विकत घेतल्यानंतर सदर ग्राहकाच्या सुरक्षेसाठी दोन हेल्मेट देणे हे शोरूम चालकाना आरटीओने निर्देश दीले आहेत. मात्र, शोरूम चालक हे सगळे आरटीओ चे निर्देश धाब्यावर बसून एकच हेल्मेट शोरूम चालकांकडून दिले जात आहे. ही सरळ सरळ २ व्हीलर विकत घेतलेल्या ग्राहकाची फसवणूक आहे.
२ व्हीलर विकत घेतलेल्या ग्राहकाला याबाबतची माहिती नसते.
२ व्हीलर शोरूम मधून ग्राहक हप्त्यावर आणि काही जण तर रोख रक्कम घेऊन २ व्हीलर खरेदी केली जाते. मात्र सदर २ व्हीलर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोरुमकडून दोन हेल्मेट दिली जातात. याबाबतची ग्राहकला माहिती नसते, असे शोरूम चालकांनी सांगितले आहे.
जर २ व्हीलर खरेदी केल्यानंतर दोन हेल्मेट द्यायची हे माहीत आहे. हे बंधनकारक असले तरी ते शोरूम चालकांना परवडण्यासारखे नाही असे शोरूम चालकांनचे म्हणणे आहे. त्यात जर एखाद्या ग्राहकाला ह नियम माहीत आसला आणि त्यांनी दोन हेल्मेटची मागणी लावून धरल्यास दोन हेल्मेट शोरूम चालकांकडून दिली जातात. मात्र, बहुतेक ग्राहकांना एकच हेल्मेट दिले जाते कारण त्यांना आरटीओचे निर्देश माहीत नसतात किवा दे मागत देखील नाही, म्हणून आम्ही त्यांना एकच हेल्मेट देतो असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे.
नियम पाळला जातो का?
आरटीओ च्या अधिकाऱ्यानी चौकशी केली असतं शहरातील ममतानगर येथील २ व्हीलर शोरूमची पाहणी केली. तेथील २ व्हीलर शोरूम मध्ये दुचाकी खरेदीनंतर एकच हेल्मेट दिले जाते, आसे प्रतेकक्षदर्शी पाहण्यात आले.अशी कबुली देखील शोरूम व्यवस्थापकांनी स्वतः दिली. या प्रकाराने आरटीओनी घालून दिलेल्या दोन हेल्मेट देण्याच्या नियमाला शोरूम चालक हे धाब्यावर बसवत असल्याचे उघड झाले.
पुढे ममतानगर परिसरातील दुसऱ्या शोरूममध्येही एकच हेल्मेट दिले जाते.असे चौकशी केलेल्या शोरूम चालकांचे म्हणणे आहे आरटीओचा दोन हेल्मेट देण्याचा नियम त्यांना माहीत आसून देखील त्याकडे शोरूम चलकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, बहुतांश ग्राहकांकडूनही तशी मागणी देखील होत नाही. म्हणून अश्या शोरूम चलकांचे चांगलेच भावते.
👇हे देखील वाचा 👇
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.