Type Here to Get Search Results !

Maharashtra Adivasi Vibhag Yojana | आश्रमशाळांना १७५ कोटी मंजूर

Maharashtra Adivasi vibhag yojana | आदिवासी विभागा मार्फत आश्रमशाळांना शासनामार्फत मिळणार इमारत भाडे, परिपोषण अनुदान,आकस्मिक अनुदान मिळणार.


आश्रमशाळांना १७५ कोटी मंजूर


आदिवासी विकास विभागांतर्गत अनुदानित आश्रमशाळांना शासनामार्फत परिपोषण अनुदान, इमारत भाडे अनुदान तसेच आकस्मिक अनुदान देण्यात येते. या अनुषंगाने आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३ - २४ या वर्षात स्वयंसेवी संस्थांना आश्रमशाळा व मुलगोद्योत्तर आश्रमशाळा चालविण्यासाठी सहाय्यक अनुदाने (कार्यक्रम खर्च) (लेखाशिर्ष २२२५ एफ १२९), ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर खाली रु.३५०.०० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित आहे.


सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रु. १७५.०० कोटी इतक्या निधी मागणीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरुन निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

आदिवासी विकास विभागाच्या मागणी क्रमांक टी-अंतर्गत २२२५ - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण या मुख्य लेखाशीर्षांतर्गत (०१) (७३) स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळा या योजनेतंर्गत (लेखाशिर्ष २२२५ एफ १२९), बाब क्र. ३१ - सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) याखाली वित्त विभागाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतुदींतून रु.१७५.०० कोटी (अक्षरी रुपये एकशे पंच्याहत्तर कोटी फक्त) इतका निधी नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

. सदर निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. वितरीत निधी खर्च करतांना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाय योजना करुन खर्च करावा.

आश्रमशाळांना १७५ कोटी मंजूर

. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेला निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तिय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि. १२.०४.२०२३ च्या शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे.

. सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारीक संदर्भ क्र.६७८/२०२३/व्यय-१४, दि.०७.०७.२०२३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७१११७५६४७०८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

   

शासन निर्णय(GR) PDF बघा 👉 (Click here)


वरील शासन निर्णय आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.