१) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. शेअवि-२०२०/प्र.क्र.३३०/११-अ, दि.१९.०४.२०२३.
२) मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, पुणे यांचे प्रसारित झालेले पत्र क्र. गोमुंशेअवि २०२२-२३/का.सां-९/ प्र.क्र.७७(अ)/ सानुग्रह निधी/१७५०५/२०२२, दि.२५.०५.२०२३ ३) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. गोमुंअ-२०२३/प्र.क्र.६६/११-अ, दि.२०.०६.२०२३.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन सन २०२३ - २४ पासुन “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” राबविण्याबाबत संदर्भ क्र. (१) दिनांक.१९.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भ क्र. (२) अन्वये “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” या योजनेअंतर्गत सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून अनुदान मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यास अनुसरुन "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” या योजनेअंतर्गत सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षाकरीता विभागस्तरावर उपलब्ध असलेला निधी रक्कम रु. १२.०० कोटी इतके अनुदान संदर्भ क्र. (३) येथील शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आले असुन सदर योजनेसाठी संदर्भ क्र.(२) च्या पत्रान्वये प्राप्त मागणीस अनुसरुन रु.१७.४५ कोटी अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज डाऊनलोड करा👉(Click here)
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आवश्यक कागदपत्रे.
- दावा अर्ज ७/१२ अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
- बँकेचे नाव
- बचत खाते क्रमांक
- आय एफ एस सी कोड
- शिधापत्रिका
- एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- अकस्मात मृत्यूची खबर
- एफ आय आर
- इंनक्वेस्ट पंचनामा
- वाहन चालविण्याचा वैध परवाना
- मृत्यू दाखला
- अपंगत्वाचा दाखला
- घोषणापत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
- अपघात घटनास्थळ पंचनामा
- पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
- वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
- कृषी अधिकारी पत्र
- औषधोपचाराचे कागदपत्र
- डिस्चार्ज कार्ड
शासन निर्णयः-
“गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना” या योजने अंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून सरकारने रु. १७.४५ कोटी इतके अनुदान वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
२. सन २०२३ - २४ करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून प्रस्तुत खर्च खालील लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा आशी मान्यता-
मागणी क्र. डी - ३
२४०१ पीक संवर्धन
(००) (०६) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (कार्यक्रम)
(२४०१ ४४२७) राज्य योजना - ३३ अर्थसहाय्य.
अधिकृत वेबसाईट www.maharashtra.gov.in👉(Click here)
३. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येणारा निधी संदर्भ क्र. (१) च्या शासन निर्णयात नमूद तरतूदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषि) यांची राहील.
४. उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त (कृषि) शासनास सादर करतील.
५. प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त (कृषि) यांना नियंत्रण अधिकारी सहाय्यक संचालक, लेखा -१, यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना नियंत्रण अधिकारी, संबंधित जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
६. प्रस्तुत शासन निर्णय, नियोजन विभाग व वित्त विभागाने त्यांचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनुक्रमे अनौसं. क्रमांक ३१९/का.१४३१, दि.२८.०६.२०२३ व अनौसं. क्रमांक १८५/२०२३/व्यय-१, दि.०६.०७.२०२३ दिलेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
७. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेताक क्र. २०२३०७२८१८२२२३३१०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
(सरिता बांदेकर - देशमुख) सह सचिव, महाराष्ट्र शासन
शासन निर्णय(GR) PDF बघा 👉 (Click here)
वरील शासन निर्णय आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |






