video recording of gram sabhas लवकरच अंमलबजावणी होणार.
प्रोसीडींग मधील अफरातफरला बसणार चाप: अंमलबजावणी होणार.
ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्षभरातून चार ते पाच ग्रामसभा होत असतात. या ग्रामसभांमध्ये सरपंचासह गाव पुढारी सोयीचे विषय समाविष्ट ग्रामस्थांसमोर न करता ते प्रोसेडींगमध्ये नंतर समाविष्ट करून आपला हेतू साध्य करतात. मात्र या परंपरेला आता चाप बसणार आहे. यापुढे आता ग्रामसभांचे थेट व्हीडीओ-ऑडीओ रेकॉर्डींग केले जाणार असुन तसे आदेश राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक आ.सु.भंडारी यांनी राज्यभरातील जि.पच्या ग्रामपंचायत विभागाला दिले आहे.
गाव पातळीवर करावयाची विकास कामे, गावाच्या हिताचे निर्णय ग्रामसभांमध्ये होवून त्याचा आराखडा देखील ग्रामसभांमध्ये मंजूर केले जातात. या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांकडून गावातील करावयाच्या कामांच्या सुचना देतात त्यानुसार आराखड्यात समाविष्ट केले जातात याच ग्रामसभांचे ग्रामसेवकांकडून पोसेडीग लिहीले जाते. मात्र बहुतांश गावांमध्ये सरपंच अथवा गाव हा आपल्या हिताचेनिर्णय सभेत न मांडता ते आडमार्गानि प्रोसेडीमध्ये समाविष्ट करून घेत असल्याने हा प्रकार नंतर लक्षात येवून अनेक वेळा बाद उदभवतात, तसेच अनेक ठिकाणी तर ग्रामसभा ग्रामस्थांच्या नुसत्या स्वाक्षऱ्या घेवून कागदोपत्री दाखविल्या जातात मात्र या पुढे अशा प्रकारांना चाप बसणार असून ग्रामसभांचे व्हीडीओ रेकॉर्डींग बंधणकारक करण्यात आले आहे.
शासनाकडून व्हीडीओसाठी जीएस निर्णय अँप.
ग्रामसभेचा व्हिडिओ रेकॉर्डिंग शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत विकसीत करण्यात आलेल्याजीएस निर्णय' ॲपवर टाकावे लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचाना हे अँप डाऊनलोड करून त्यात ग्रामसभेत घेतलेल्या सगळ्या निर्णयाचा किमान २ मिनीट ते १५ मिनीटाचा व्हीडीओ रेकार्ड करून तो अँपवर अपलोड करावा लागणार आहे.केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाकडून जीएस निर्णय हे अँप तयार करून त्यात ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाचा १५ मिनीटाचा व्हीडीओ या अँपमध्ये अपलोड करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामसभेत कोणते निर्णय घेण्यात आले याची माहीती उपलब्ध होणार आहे. आता पर्यंत ग्रामसेवकाकडून ग्रामसभाचे लेखी प्रोसेडींग केले जात होते. मात्र आता या पुढे या ग्रामसभेचे प्रोसेडीग बदलणे शक्य होणार नाही. याबाबत बिडीओ स्तरावर सुचना केल्या असुन बैठकीत नसे आदेश देखील देण्यात आले आहे.
सरपंचांसह ग्रामसेवकांची डोकेदुखी वाढणार.
बीडीओचा असणार वाँच.
ग्रामसभांचे वेळापत्रक भरणे बंधणकारक.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



