Type Here to Get Search Results !

पीक विमा योजना : फक्त १ रुपयात पीक विमा योजना | आजच आपले नाव नोंदवा Peek Vima Yojana In Marathi.

Peek Vima Yojana-Only 1 rupees.

पीक विमा योजना : फक्त १ रुपयात पीक विमा योजना | आजच आपले नाव नोंदवा.
Peek Vima Yojana In Marathi.

आपल्या देशयात तसेच विविध राज्यान मद्धे येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे होणारे नुसकान ह्या वर उपाय योजना म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना ही २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे.म्हणून २०२३-२४ मध्ये देखील राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जात आहे. यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त खर्च विमा हप्त्याच्या ११० टक्यांपर्यंत असणार आहे, या पेक्षा जास्त नुकसान भरपाई असणारी राज्य शासन देईल. ही नुकसान भरपाई एकूण शेती विमा हप्त्याच्या ८० टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम ही स्वतःकडे नफा म्हणून ठेवेल आणि उर्वरित शिल्लक रक्कम पीक विमा माध्यमातून राज्य शासनास परत करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सन २०१६-१७ पासून ते २०२२-२३ आज पर्यंत साधारण रुपये २२ हजार ६२९ कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

योजनेतील पिके खालील प्रमाणे.

  • भात (धान), बाजरी, नाचणी (रागी) तूर, मूग,उडीद,मका,खरीप
  •  ज्वारी.कांदा,तीळ,सूर्यफूल,कारळे,कापूस,भुईमूग,सोयाबीन,

सहभागी शेतकरी.

सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ह्या  योजनेतील त्यांचा सहभाग ऐच्छिक राहील. भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत शेतीचे भाडे करार अपलोड करणे बंधनकारक राहील.

या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अंतिम मुदत - ३१ जुलै २०२३

• शेतीतील सर्व पिकांसाठी जोखीमस्तरः ७० टक्के

• विमा हप्ता : सर्व प्रकारच्या पिकांसाठी प्रती अर्ज फक्त १ रुपया.

यासाठी मिळेल संरक्षण.

  • पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट लक्षात घेतली जाईल.
  • पीक पेरणीआधी किंवा लावणीआधी नुकसान यात अपुरा पाऊस, हवामान येणारे बदल व इतर प्रतिकूल घटकांमुळे त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी अथवा लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देने आहे.
  • चालू हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसाचा खंड, ओला व सुखा दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात ५०टक्यांहून अधिक घट असेल तर विमा संरक्षण देने आहे.
  • पीक काढणी पूर्व चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर काढलेल्या पिकाची सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या त्यात पिकाचे नुकसान झाल्यास कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
  • येणारी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र संपुर्ण जलमय झाल्यास, भूस्खलन किवा गारपीट यांन सारख्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त भागातील पिकाचे नुकसान हे वैयक्तिक रित्या पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

या कंपन्या देणार पीक विमा जिल्हानिहाय सेवा.

  • (Agricultural Insurance Company of India) भारतीय कृषी विमा कंपनी (सांगली,बुलडाणा,नंदुरबार, बीड,वाशीम) 
  • ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. Oriental Insurance Company Ltd.(सातारा,चंद्रपूर,नगर,नाशिक,सोलापूर, जळगाव, )
  • आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ICICI Lombard General Insurance Company Ltd.(वर्धा, नागपूर,परभणी) 
  • युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि.United India General Insurance Company Ltd (रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नांदेड, ठाणे) 
  • एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.HDFC Irgo General Insurance Company Ltd(धुळे, पुणे, उस्मानाबाद,हिंगोली, अकोला) 
  • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. Universal Sompo General Insurance Company Ltd(कोल्हापूर,जालना, गोंदिया, )
  • चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. Cholamandalam MS General Insurance Company Ltd(पालघर,औरंगाबाद, भंडारा, रायगड)
  • रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.Reliance General Insurance Company Ltd(अमरावती, गडचिरोली,यवतमाळ)
  • एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.SBI General Insurance Company Ltd.(लातूर) 
खरीप हंगामातील सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कमेत जिल्हानिहाय सेवा देणार.

पीकनिहाय विमा संरक्षणाची रक्कम (रुपये प्रति हेक्टर).

  • ज्वारी (२० हजार ते ३२ हजार ५००)
  • बाजरी (१८ हजार ते ३३ हजार ९१३)
  • सोयाबीन (३१ हजार २५० ते ५७ हजार २६७)
  • भात (४० हजार ते ५१ हजार ७६०)
  • नाचणी (१३ हजार ७५० ते २० हजार)
  • भुईमूग (२९ हजार ते ४२ हजार ९७१)
  • मका (६ हजार ते ३५ हजार ५९८)
  • उडीद (२० हजार ते २६ हजार ०२५)
  • मूग (२० हजार ते २५ हजार ८१७)
  • तूर (२५ हजार ते ३६ हजार ८०२)
  • कारळे (१३ हजार ७५०)
  • तीळ (२२ हजार ते २५ हजार).
  • कांदा (४६ हजार ते ८१ हजार ४२२)
  • कापूस (२३ हजार ते ५९ हजार ९८३३)

नुकसान भरपाईसाठी.

  • स्थानिक नेसर्गिक आपत्ती, पीक काढणी आधी नुकसान या अंतर्गत पिकांचे काही नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्याने विमा कंपनीस कळविणे हे बंधनकारक राहील. ही सूचना केंद्र शासन पीक विमा APP किवा संबंधित विमा कंपनी टोल फ्री क्रमांक ह्या वर नोंद करावी, किंवा विमा कंपनीचे तालुका/जिल्हातील कार्यालय, त्या संबंधित बँक किंवा कृषी महसूल विभागाद्वारे देण्यात यावी. यात नुकसान ग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची रक्कम ही निश्चित केली जाते.
  • खरीप २०२३ च्या हंगामात उत्पादनाच्या आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल/ तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे दारडोई उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते.
  • हंगामातील सरासरी उत्पादन काढताना कापूस, भात,सोयाबीन या निवडक पिकाच्या बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान वापरुन त्या द्वारे एकूण प्राप्त झालेल्या उत्पादनास ३० टक्के आणि पीक कापणी द्वारे प्राप्त झालेल्या उत्पादनास ७० टक्के भर देऊन एकूण पिकाचे उत्पादन ठरवले जाणार आहे. उर्वरित पिकांच्या बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त झालेले उत्पादन हे विचारात धरले जाणार आहे. 

पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय कारव लागेल.

  • संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात पेक्षा जास्त घट आल्यास वरील निर्णया नुकसार भरपाईची रक्कम ठरवली जाते. सदर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांकरिता या विमा योजने अंतर्गत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात डायरेक्ट जमा केली जाते.
  • विमा योजनेतंर्गत सर्व प्रकारची नुकसान भरपाईची रक्कम ही संबंधित शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्याने आपले बँक खाते योग्य माहिती देने ह्याची खबरदारी घ्यावी.

सहभागी होण्यासाठी.

  • शेतकऱ्याने या पीक विमा योजने अंतर्गत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांकच्या आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे बंधनकारक आहे.
  • इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बैंक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेची पोच पावती जपून ठेवावी.
  • कॉमन सर्विस सेंटर किंवा आपल्या जवळील सायबर कॅफे मध्ये आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा खाली देलेल्या लिंक वर जाऊन साहाय्य घेऊ शकता.

पीक विमा संदर्भातील महत्वाचे प्रश्न.

१) पीक विमा योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?
उत्तर: महाराष्ट्र राज्यतील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे फक्त शेतकऱ्यांना या योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरून देयचा आहे.तेही फक्त १ रुपयात.

२) पीक विमा भरल्याचे फायदे काय आहेत ?
उत्तर: शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक विमा ऑनलाईन भरला असेल तर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा रोगांच्या प्रभावामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई हि तुम्हाला मिळत असते.

३) पीक विम्यात कोणत्या पिकांचा समावेश आहे ?
उत्तर: यामध्ये राज्यातील विविध विभागांचा विचार करून बाजरी,तांदूळ,ज्वारी,नाचणी,कारले,उडीद,मुग,भुईमुग,सोयाबीन,कापूस,तीळ,तूर,कांदा अशा एकूण 14 पिकांचा समावेश आहे.

४) पीक विमा योजनेचा फॉर्म कसा व कुठे भरायचा ?
उत्तर: या योजनेचा फॉर्म हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे त्यासाठी वेबसाईट देण्यात आली आहे.www.pmfby.gov.in

५) या योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरता येतो का ?
उत्तर: नाही.या योजनेसाठी तुम्हाला फक्त ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे.
योजनेत आपला नाव नोंदवण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
👉www.pmfby.gov.in

सूचना : योजनेच्या अधिक व अद्ययावत माहितीसाठी संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.(या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अंतिम मुदत - ३१ जुलै २०२३)


👇ही योजना देखील बघा👇

तुमच्या मुलीलाही मिळू शकतात ५० हजार रुपये!👉(Click here)

वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.