Type Here to Get Search Results !

डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर (Property Card Online Download)

How To Download Digitally Signed Property Cards Online

How To Download Digitally Signed Property Cards Online


स्वामित्व योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराचे व जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. ज्याप्रमाणे सातबारा उतार्‍यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किती शेतजमीन आहे, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते. बिगर शेतजमीन क्षेत्रातील व्यक्तीच्या नावावर स्थावर मालमत्ता म्हणजेच स्वतांच्या नावे किती घर आहे ?बंगला ही व्यावसायिक इमारत असल्याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद आहे. या योजनेद्वारे देशभरातील गावांचे ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यातून प्रत्येक घराचा नकाशा, उत्पन्नाचे मिळकत पत्रिका उपलब्धदेण्यात येणार आहे. 

डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रोसेस:


खाली दिलेली महाराष्ट्र राज्य महसूल विभागाची अधिकृत वेबसाइट लिंक उघडा.




तुम्ही या वेबसाइटवर आधीच नोंदणी केली असल्यास, तुम्ही लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून या साइटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता.


परंतु, जर तुम्ही येथे प्रथमच आला असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला येथे New User Registration (नवीन वापरकर्ता नोंदणी) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. खालील प्रमाणे "Regular Login" ह पर्याय निवडून नोंदणी करा किंवा "OTP" लॉगिन पर्याय निवडा.
 

New User Registration (नवीन वापरकर्ता नोंदणी) करताना एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला खालील माहिती भरायची आहे.

New User Registration दरम्यान एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला खालील माहिती भरावी लागेल.


  • संपूर्ण वैयक्तिक माहिती (Personal Information)

  • संपूर्ण पत्याची माहिती (Address Information)

  • लॉगइनची  माहिती (Login Information)


यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती एक मेसेज येईल की नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.

लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. या पेजवर आपण "डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रॉपर्टी कार्ड"(Digitally signed Property card) पर्याय पाहू शकता, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर ‘डिजिटल स्वाक्षरी केलेले प्रॉपर्टी कार्ड’(Digitally signed Property card) नावाचे पेज उघडेल. यामध्ये तुम्हाला प्रथम तुमचा विभाग, नंतर जिल्हा आणि त्यानंतर तुमचे गाव किंवा तहसील मालमत्ता ज्या कार्यालयात येते ते निवडा. त्यानंतर गाव निवडा आणि नंतर CTS क्रमांक टाका. सीटीएस (CTS) म्हणजे सिटी सर्व्हे नंबर. याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदलेली संख्या. मालमत्तेशी संबंधित सर्व नोंदी या क्रमांकाशी संबंधित आहेत.

जर तुम्हाला CTS क्रमांक माहित नसेल तर तुम्ही येथे प्लॉट क्रमांक टाकू शकता. त्यानंतर सिलेक्ट सीटीएस नंबर पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला तो नंबर तिथे आलेला दिसेल. तो नंबर निवडण्यासाठी त्यावर क्लिक करा.


शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड होईल, ते PDF फाईलमध्ये डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या.

Download property card
Download property card


या कार्डचे नाव प्रॉपर्टी शीट आहे. सुरुवातीला गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव दिले आहे. त्यानंतर सिटी सर्व्हे नंबर किंवा प्लॉट नंबर आणि त्याचे चौरस मीटर क्षेत्रफळ दिले आहे. त्यानंतर मूळ हक्क धारक पर्यायासमोर भूखंड कोणाच्या नावावर आहे याची माहिती दिली जाते. त्यानंतर खाली तळाशी एक सूचना आहे. त्या कार्डावर कोणत्या सरकारी अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे, याची माहिती आहे.


डिजिटल स्वाक्षरीमुळे हे प्रॉपर्टी कार्ड सरकारी आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येते. आता सर्वसामान्य नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. प्रॉपर्टी कार्डवर स्थावर मालमत्तेच्या व्यवहारांची नोंद ठेवली जाईल.आतापर्यंत राज्यातील ११६५ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून, राज्यातील सर्व गावांचे ड्रोन सर्वेक्षण लवकरच पूर्ण होणार आहे. या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीही बँकांकडून कर्ज घेऊ शकतात.



👇हे देखील वाचा 👇


भारतीय आमदारांचा पगार.👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.