भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.मागील वर्षी या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरजला यंदा आपल्या पदकाचा रंग सुवर्ण पदकात बदलण्यात यश आले. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकसह जागतिक चॅम्पियनशिपमध्ये तिरंगा फडकवणारा तो अभिनव बिंद्रानंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे. अंतिम फेरीत नीरजला दुसरी ९० मीटरची शर्यत पार करता आली नसली तरी दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८८.१७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले. तसेच पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.८२ मीटर भाला फेक करून दुसरे स्थान पटकावले.
नीरज व्यतिरिक्त, डीपी मनू आणि किशोर जेना या दोन अन्य भारतीयांनीही भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या दोन्ही खेळाडूंना पदक जिंकण्यात यश आले नाही, पण प्रथम-६ मध्ये राहून त्यांनी भारताची शान नक्कीच वाढवली.
भारताच्या किशोर जेना ८४.७७ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम भाला थ्रोसह पाचव्या स्थानावर राहिला. डीपी मनूने ८४.१४ मीटरच्या सर्वोत्तम भाला थ्रोसह सहावे स्थान पटकावले.
प्रमुख स्पर्धांमध्ये नीरज चोप्राचे रेकॉर्ड.Neeraj Chopra Becomes First Indian To Win Gold
- दक्षिण आशियाई खेळ (गुवाहाटी २०१६) - सुवर्ण पदक (८२.२३मी)
- जागतिक चॅम्पियनशिप (बायडगोस्क्झ २०१६) - सुवर्ण पदक (८६.४८मी)
- आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप (हो ची मिन्ह २०१६) - रौप्य पदक (७७.६०मी)
- आशियाई चॅम्पियनशिप (भुवनेश्वर (२०१७) - सुवर्ण पदक (८५.२०मी)
- राष्ट्रकुल खेळ (गोल्ड कोस्ट २०१८) - सुवर्णपदक (८६.४७मी)
- आशियाई खेळ (जकार्ता २०१८) - सुवर्णपदक (८८.०६मी)
- टोकियो ऑलिम्पिक खेळ (२०२०) - सुवर्णपदक (८७.५८मी)
- डायमंड लीग (स्टॉकहोम २०२२) - ४९ वें स्थान)
- जागतिक चॅम्पियनशिप (ओरेगॉन २०२२) - दुसरे स्थान, रौप्य पदक (८८.३९मी)
- जागतिक चॅम्पियनशिप (बुडापेस्ट २०२३) - सुवर्णपदक (८८.१७मी)

👇हे देखील वाचा👇
विमान कोसळल्याने १० जणांचा मृत्यू.👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




अभिनंदन..
ReplyDelete