Type Here to Get Search Results !

सातारा जिल्ह्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू | Satara Accident

 Satara Accident Breaking News.



सातारच्या सूर्याचीवडी येथे मायणी- दहिवडी रस्त्यावर मारूती व्हॅनच्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. पांडूरंग देशमुख यांच्या मारूती व्हॅनमधून काही लोक सांगलीच्या लोकरेवाडी येथे देवदर्शनाला जात होते. त्यावेळी रस्त्यावरील खड्डा चुकवतांनी कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. 

Satara Accident

अपघाताचे वृत्त समजताच वडूज पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व जखमींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नसून, हे सर्वजण बनपुरी आणि कुरोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पहाटेच्या सुमारास कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघाताचा तपास वडूज पोलीस करत आहेत.


👇हे देखील वाचा👇

एसटीचा भीषण अपघात.(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.

 

Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.