Type Here to Get Search Results !

Motorola Edge 40 Neo 144 Hz रिफ्रेश रेटसह २५ हजार रुपयांच्या किंमतीत लॉन्च | Motorola Edge Launched In India

Motorola Edge 40 Neo launched with 144 Hz refresh rate at a price of Rs 25 thousand.

Motorola Edge 40 Neo स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. हा 5G स्मार्टफोन आहे. 25,000 रुपयांच्या रेंजमध्ये येणारा हा फोन आपल्याला अनेक चांगल्या फीचर्स उपलब्ध करून देतो. चला तर जाणून घेऊया या फोनबद्दल अधिक माहिती.

    Motorola Edge 40 Neo लॉन्च:

    Motorola Edge 40 Neo 5G लॉन्च झाला आहे. हा फोन 144 Hz च्या रीफ्रेश रेट आणि MediaTek Dimension 7030 प्रोसेसरसह येतो. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमेरि सेन्सर आहे. तसेच, 5000mAh बॅटरी 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. Motorola Edge 40 Neo ची किंमत, उपलब्धता आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. 

    Motorola Edge 40 Neo किंमत आणि उपलब्धता:

    Motorola Edge 40 Neo चे 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंट 23,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याच सोबत त्याचे 12 जीबी स्टोरेज आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट हे 25,999 रुपयांना खरेदी खरेदी करू शकता. हा फोन ब्लॅक ब्युटी, कॅनल बे आणि सुथिंग सी कलरमध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ह्या कंपनीच्या भारतीय वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल. ह्या फोन ची विक्री 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून केली जाईल.

    ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यावर 3,000 रुपयांची सूट दिली जात आहे. लॉन्च ऑफरमध्ये निवडक बँक क्रेडिट कार्ड आणि EMI वर रु. 1,000 ची सूट असेल. याव्यतिरिक्त, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय प्रति महिना 3,500 रुपयांपासून सुरू होतात.

    Motorola Edge 40 Neo चे वैशिष्ट्ये:

    हे ड्युअल सिमवर काम करते. यामध्ये Android 13 देण्यात आला आहे. या फोनचा रिफ्रेश दर 144 Hz आहे. यात 6.55 इंच फुल-एचडी प्लस पोलराइज्ड कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080x2400 आहे. हा फोन ऑक्टा-कोर 6nm MediaTek डायमेंशन 7030 प्रोसेसर आहे. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे.

    Motorola Edge 40 Neo मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट आणि f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सेल आहे. त्याचा दुसरा सेन्सर अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह 13 मेगापिक्सेलचा आहे. फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याला IP68 रेटिंग देण्यात आली आहे.

    कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi, Bluetooth 5.3, FM रेडिओ, GPS, A-GPS, GLONASS, Galileo, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, तुम्हाला 36 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळेल.




    वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.



    अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


    Google News

    👉 (Click here)

    व्हॉट्सअँप ग्रुप

    👉 (Click here)

    टेलिग्राम ग्रुप

    👉 (Click here)

    इन्स्टाग्राम पेज

    👉 (Click here)

    फेसबुक पेज

    👉 (Click here)

    Tags

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.