Type Here to Get Search Results !

Mumbai Air Hostess Murder | मुंबईत एअर होस्टेसच्या हत्येने शहर हादरलं ! हत्या करून आरोपी फरार

एअर होस्टेसच्या हत्येने शहर मुंबई हादरलं, २३ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

Mumbai Air Hostess Murder | मुंबईत होस्टेसच्या हत्येने शहर हादरलं !  हत्या करून आरोपी फरार
Mumbai Air Hostess Murder

मृत मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. ती आपल्या बहिण आणि मित्रासोबत एन-जी कॉम्प्लेक्समध्ये राहायला होती. काही दिवासपूर्वी तिची बहीण आणि इतर फ्लॅटमेट गावी गेले असल्याने तिच्याशिवाय घरी कोणीच नव्हते.तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्या पाठोपाठ आता मुंबईत सुद्धा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच मुंबईतील पवई (मरोळ) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. मृत तरुणी एअर होस्टेस (air hostess murder) म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. तिचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला आहे.(crime news) याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातमीचा सविस्तर व्हिडिओ.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपल ओगरे असे मृत तरुणीचे नाव असून ती २३ वर्षांची होती. ती मूळ छत्तीसगडच्या रायपूर येथील रहिवासी होती. मात्र सध्या ती मुंबईतील मरोळ येथील एन-जी कॉम्प्लेक्समधील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्यासोबत तिची बहीण आणि इतर फ्लॅटमेट होते. गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

Mumbai Air Hostess Murder | मुंबईत होस्टेसच्या हत्येने शहर हादरलं !  हत्या करून आरोपी फरार

Mumbai Air Hostess Murder (N-G complex)

सदर घटनेच्या दिवशी रुपल ही घरात एकटीच होती. तिची बहीण आणि इतर फ्लॅटमेट गावी गेले होते त्यामुळे तिच्यासोबत घरी कोणी नव्हते. तिचे कुटुंबीय तिला बराच वेळ फोन करत होते, मात्र ती फोन उचलत नव्हती.शेवटी कुटुंबीयांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि ती ठीक आहे का ते तपासायला सांगितले. तिची मैत्रिण तिच्या घरी पोहोचली. बराच वेळ दार ठोठावूनही कोणीच उघडले नाही. शेवटी तिने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रुपल मृतावस्थेत आढळून आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


👇हे देखील वाचा👇

Breaking News : विमान कोसळल्याने १० जणांचा मृत्यू.👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.