Type Here to Get Search Results !

Two Alien Dead Bodies Found in Mexico Parliament | मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे दोन मृतदेह, १ हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा.

अखेर एलियन्सच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला! मेक्सिकोच्या संसदेत 1000 वर्षांपूर्वीच्या दोन एलियन्सचे मृतदेह


आपण अनेक प्रकारचे मानवी शरीर/मृतदेह पाहिले असतील, परंतु ज्या प्रकारचे मेक्सिकोच्या (Mexico) संसदेत एक विचित्र मानवी मृतदेह मांडण्यात आला ते काही वेगळच होत. हयात एक सर्वाना कोड्यात टाकणारी गोष्ट म्हणजे हा मानवी मृतदेह नसून हा एक ‘एलियन’ चा मृतदेह आहे. नक्की हा सगळा प्रकार काय आहे या बद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Two Alien Dead Bodies Found in Mexico Parliament | मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे मृतदेह दाखवले...

मेक्सिकोच्या काँग्रेसने संसदेत १००० वर्षे जुने 'एलियन' मृतदेह सर्वांसमोर ठेवण्यात आला. हा मृतदेह सर्वांना पाहता यावा म्हणून एका शीत पेटीत ठेवण्यात आला आहे. या 'एलियन' मृतदेहांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

These alleged alien bodies were discovered in mines in Cusco, Peru, and were carbon analyzed by the National Autonomous University of Mexico. The corpses, much smaller than an adult human, were displayed in glass boxes, with discernible facial features such as eyes, a nose, and mouth.

मेक्सिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेक्सिकन काँग्रेसच्या संसदेच्या सार्वजनिक सुनावणी दरम्यान दोन 'एलियन मृतदेह' दाखवण्यात आले. ही सुनावणी ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीम देखील करण्यात आली, ज्यामुळे हा व्हिडिओ जगभरातील लोकांपर्यंत पोहोचला. तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्याने या मृतदेहांकडे पाहत होते.

DNA मुळे ही बाब समोर आली आहे. This thing came out in DNA.

मृतदेहांच्या नमुन्यांमधून मिळालेल्या डीएनएची(DNA)चाचणी करण्यात आली आणि त्याची उर्वरित डीएनएशी तुलना केल्यानंतर नमुन्यातील ३०% टक्क्यांहून अधिक डीएनए अज्ञात (Unknown) असल्याचे आढळून आले. हे दोन्ही मृतदेह UFO तज्ञ जेमी मौसन यांनी संसदेत सर्वांसमोर मांडले.

‘एलियन’ मृतदेह १००० वर्षे जुने ! ‘Alien’ dead bodies are 1000 years old !

जेमी मौसन यांनी मेक्सिकन सरकारच्या सदस्यांना आणि अधिकार्‍यांना सांगितले की त्यांच्या डीएनए नमुन्याचा नुकताच नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिकोमध्ये (National Autonomous University Of Mexico) अभ्यास करण्यात आला. येथे शास्त्रज्ञांना रेडिओकार्बन डेटिंगचा वापर करून डीएनए पुरावे काढण्यात यश आले. पेरूमधील (Peru) कुज्को येथे सापडलेले हे मृतदेह सुमारे १००० वर्षे जुने असल्याचे मानले जाते.

Two Alien Dead Bodies Found in Mexico Parliament | मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे मृतदेह दाखवले...

हाताला,पायाला फक्त ३ बोटे होती. Hand and foot had only 3 fingers.

संसदेच्या सुनावणीदरम्यान मृतदेहांचे एक्स-रे देखील दाखवण्यात आले. UFO तज्ञ जेमी मौसन यांनी दावा केला आहे की ‘एलियन’ शरीरात रॉड आणि अंड्यासारखी विचित्र वस्तूही सापडली आहे. या मृतदेहांच्या हाताला आणि पायाला ३ बोटे असल्याचे लाइव्ह स्ट्रिमिंगमधून समोर आले आहे. जेमी मौसनने सांगितले की हे पृथ्वीचे असू शकत नाहीत, कारण ते मानवी सांगाड्यांपेक्षा बरेच वेगळे आहेत.


अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.