खासगी बस उलटून ६ तर रुग्णवाहिका मालवाहू ट्रकला आदळून ४ जणांचा मृत्यू
बीड : आष्टी फाटा (आष्टी) येथे गुरुवारी पहाटे चालकाचे खासगी बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाले. बीड अहमदनगर राज्य महामार्गावरील दौलवडगाव येथे बुधवारी रात्री उशिरा भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेला मालवाहू ट्रकने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन्ही अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे दोन अपघातांच्या वृत्ताने जिल्हा हादरला आहे. दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व जखमींना उपचारासाठी पाठवले.
बीड जिल्ह्यातील अंभोरा (ता. आष्टी) येथील दौलवडगाव शिवरात दत्त मंदिराजवळ धामणगाव (ता. आष्टी) येथून मालमोटार (क्र.MH २१ X ८६००) अहमदनगरकडे जात होती. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास व्हेंको कंपनीकडे डावीकडे वळण घेत असताना रुग्णवाहिका (क्र. MH-१६ Q ९५०७) मागून येणाऱ्या मालवाहू गाडीला धडकली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सीताराम लोखंडे, (वय ३५, रा. धामणगाव ता. आष्टी), मनोज पंगू तिरपुडे, पप्पू पंगू तिरकुंडे (दोघे रा. जत देवळा, जि. पाथर्डी) यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ. राजेश बाबासाहेब डॉ. झिंजुरके, (वय ३५, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांचा अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी ज्ञानदेव सूर्यभान घुमरे (वय ४५, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Bus Accident | मुंबईहून बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, सहा प्रवाशांचा मृत्यू.
दुसरा अपघात बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्स या खासगी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस उलटून भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाल्याचे समजते. यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जवळपास ४५ ते ५० प्रवासी यातून प्रवास करत होते.आष्टा फाट्याजवळ (ता. आष्टी) हा अपघात झाला. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



