Type Here to Get Search Results !

Baba Maharaj Satarkar Passed Away : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Veteran Kirtanist Baba Maharaj Satarkar Passed Away: ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. नवी मुंबई नेरुळ येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Baba Maharaj Satarkar Passed Away : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ते ८९ वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी ३ नंतर नेरुळ जिमखान्यासमोरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.

दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.