Salman Khan Tiger 3 Movie Official Trailer Release.
टायगर-3 या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर आणि जोया म्हणजेच सलमान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. तसेच या ट्रेलरमधील इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Tiger 3 Movie official trailer release
टायगर-3 चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच टायगरचे कुटुंब दिसत आहे. त्यानंतर टायगर आणि झोया अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. टायगर-3 चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमानचा 'जब तक टायगर मारा नहीं, तब तक टायगर हरा नहीं...' हा डायलॉग ऐकायला मिळत आहे. टायगर 3 चा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटात टायगर हा देश आणि कुटुंबासाठी लढणार असल्याचा अंदाज बांधता येतो. या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्रेलरमध्ये सलमान खान काही स्टंट करताना दिसत आहे. तसेच टायगर-3 चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कतरिनाचे काही अॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. टायगर 3 च्या ट्रेलरमध्ये सलमानचा डायलॉग 'आतिशबाजी तुमने शुरू की खत्म मैं करूंगा' देखील ऐकायला मिळत आहे. टायगर 3 चा हा 2 मिनिटे 51 सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यंदा 'सलमान हा दिवाळीला बॉक्स ऑफिसवर धमाका करणार', असा अंदाज नेटकरी लावत आहेत.
वरील व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



