Pik Vima Yojana In Maharashtra Distribution Date Declare 2023

Pik Vima Yojana Date 2023 ही राज्यातील सर्व शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेच्या २५ % आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही मदत पात्र ठरलेल्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दिली जाणार आहे. पीक विम्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या ४०६ कोटींचा निधी मंजूर करून आता वितरीत करण्यात सुरुवात झाली आहे.या बाबत सविस्तर माहिती पाहू या.
Peek Vima Yojana-Only 1 rupees Maharashtra 2023
शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विमा भरला असेल आणि आता पीक विमा लाभार्थी रकमेची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने आता सर्व लाभार्थ्यांना २५% रक्कम देण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात सुमारे १.२५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बहुतेक १ कोटी ७० लाख ६७ हजार शेतकर्यांनी यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये त्यांचा पीक विमा भरला होता. यावर्षी राज्य सरकारने शेतकर्यांना फक्क १रु. मध्ये पिक विमा भरण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती आणि उर्वरित सर्व रक्कम ही राज्य सरकार विमा कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले होते आणि त्यामुळेच ह्या राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता.
|
योजनेचे नाव |
प्रधानमंत्री फसल बिमा योजना |
|
लाभार्थी |
१ कोटी २५ लाख शेतकरी |
|
लाभ रक्कम |
२५% पिकविमा रक्कम |
|
विभाग |
महाराष्ट्र राज्य कृषी व
महसूल विभाग |
|
वर्ष |
२०२३ |
|
निधी जमा होण्याची तारीख |
२० ऑक्टोबर २०२३ |
यावर्षी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, सर्व पिके पाण्या अभावी करपत आहेत आणि पावसा अभावी उरली सुरलेली पीक देखील विविध रोगांनी ग्रासली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऐन सनासुदीच्या काळात प्रचंड मोठ्या आर्थिक नुकसाणीला सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर द्यावी, अशी विनंती शेतकरी आता सरकारकडे करत असल्याचे दिसून येत आहे.
Pik Vima List Pdf Download Link 2023
या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून आता सरकारनेही तातडीने पावले उचलली असून पहिल्या टप्प्यात १.२५ कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांचीयादी देखील फायनल करण्यात आली असून २० ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम खात्यात जमा जाणार आहे.
|
पिक विमा योजना लाभार्थी यादी
पाहण्यासाठी |
|
|
PM-KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित e-KYC
प्रोसेस घरबसल्या कशी करायची ? |
|
|
पिक विमा योजना लाभ
घेण्यासाठी वेबसाईट |
|
|
पिक विमा भरून देखील तुमच्या
खात्यात पैसे आले नसतील तर Onlline तक्रार करा. |
इथे क्लिक करा |
पिक विमा योजनेची रक्कम खात्यावर कधी जमा होणार ?

वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |

