Sangli Mhaisal Check Post Gutkha truck seized: म्हैसाळ मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्ट जवळ स्थिर सव्हक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसानी कारवाई.
म्हैसाळ : मिरज कागवाड राज्य महामार्गावर म्हैसाळ चेकपोस्टजवळ स्थिर सव्हक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत १६ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा, गाडी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज, गुरुवारी सकाळी करण्यात आली. याप्रकरणी चालक सोहेल शेख (वय २८) रा. सांगलीला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारने सीमेवर चौक्या उभारल्या आहेत. (Sangli Mhaisal Check Post Gutkha truck worth Rs 16 lakh seized) आज, गुरुवारी सकाळी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १० सीआर ०६४१ ) कर्नाटकातून मिरजेकडे गुटखा घेऊन येत होते. यावेळी ही गाडी कर्नाटक बसच्या खालीून जात होती.
यावेळी पोलीस नाईक प्रवीण कांबळे व पोलीस हवालदार आचिश शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदूम यांनी संशय आल्याने कार थांबवली असता तपासणी केली असता ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. (Sangli Gutkha truck seized) स्थिर सव्हक्षण पथकाचे पथक प्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, रॉकेश शिंदे, राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी विकास भोसले, भरत पवार, उपस्थित होते.
राजारामबापू वारले तेव्हापासून वैर संपलं,आता शेतकरीपुत्राचा बळी देऊ नका,👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



