Type Here to Get Search Results !

राजारामबापू वारले तेव्हापासून वैर संपलं, आता शेतकरीपुत्राचा बळी देऊ नका, विशाल पाटील यांनी रणशिंग फुंकलं!

Vishal Patil:  ज्या दिवशी राजारामबापू वारले त्याच दिवशी वसंतदादा आणि राजांराम बापू वाद मिटला आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

Vishal Patil Bhashan Sangli Lok Sabha Election News

सांगली:  शेतकऱ्याच्या मुलाने खासदार आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये, असे म्हणत विशाल पाटील (Vishal Patil)  यांनी महाविकासआघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil)  यांना प्रत्युत्तर दिले आहे.  मी स्वार्थासाठी लढत नाही. ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वसंतदादा आणि राजांराम बापू वाद मिटला, असे म्हणत विशाल पाटील यांनी  रणशिंग फुंकलं आहे.सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Lok Sabha Election) काँग्रेसचे नेते (Congress)  विशाल पाटलांनी काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते. 

जयंत पाटील यांचे वडील सांगलीचे राजारामबापू पाटील आणि विशाल पाटील यांचे आजोबा वसंतदादा पाटील यांच्यात एकेकाळी राजकीय वैर होते. (Vishal Patil Bhashan Sangli Lok Sabha Election News) त्यामुळे विशाल पाटील यांना याचा फटका बसल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना विशाल पाटील म्हणाले, ज्या दिवशी राजारामबापूंचा मृत्यू झाला त्याच दिवशी वसंतदादा आणि राजारामबापू यांच्यातील वाद मिटला आहे. वसंतदादा आणि काँग्रेस बदलाबाबत बोलताना विशाल पाटील भावूक झाले.

वडील वारल्यापासून उमेदवारीसाठी जे थांबलो ते आजपर्यंत थांबलोय : विशाल पाटील 

 हा काँग्रेस पक्षाचा लढा आहे. ही काँग्रेसमधील बंड आहेत. जिल्ह्यातून पदाधिकारी आले. प्रकाश आंबडेकर यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातील बाळासाहेब उर्फ विश्वजित कदम यांचेही आम्ही आभार मानतो. आभार अजित घोरपडे, विलासराव जगताप त्यांचे देखील आभार मानले. वसंतदादांच्या घरावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा अंजनीपुत्र आपल्या मागे असतो. सुमनताई पाटील आणि रोहित आर.आर.पाटील यांचाही मला पाठिंबा आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आज उपस्थित आहे. त्या पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना सूट दिली आहे. जयश्रीताई पाटील आज धैर्याने पुढे चालल्या. आज ती माझ्यापेक्षा पुढे होती याचा मला अभिमान आहे. मी स्वार्थासाठी लढत नाही. २००५ मध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला उमेदवारी मिळाली नाही, पण मी वाट पाहिली. विशाल पाटील म्हणाले की, मी आजपर्यंत थांबलो, पक्षावर एकतर्फी प्रेम केले.

आता मागे हटणार नाही : विशाल पाटील

चंद्रहार पाटील यांनाही विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशाल पाटील म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा खासदार, आमदार व्हावा अशी आमची इच्छा आहे. पण शेतकऱ्याच्या मुलाचा बळी देऊ नये. हे काँग्रेसचे बंड आहे, काँग्रेसवर आमचे प्रेम कायम राहील

आमच्याकडून चिन्ह घेतले तर आम्ही वेगळ्या चिन्हावर निवडून येऊ, आता मागे हटणार नाही.


ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा विशाल पाटलांसमोर नवा प्रस्ताव.👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.