Majhi Kanya Bhagyashree Yojana
तुमच्या मुलीलाही मिळू शकतात ५० हजार रुपये, जाणून घ्या काय आहे 'माझी कन्या भाग्यश्री योजना.
Majhi Kanya Bhagyashree Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकारे हे दोघेही सरकार वेगवेगळ्या योजना राबवतात. या योजने अंतर्गत गरजू,होतकरु लोकांला विमा, पेन्शन, रेशन, घर, वीज, रोजगार यांसोबत इतर अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. एवढ्यावरच नाही तर देशातील मुलींसाठी विशेषकरून: एक नाही तर अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.
त्यातील एक योजना म्हणजे 'माझी कन्या भाग्यश्री योजना'. या योजनेंतर्गत मुलगी जन्माला आल्यावर शासनाकडून त्या मुलीच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. यात तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमची या योजनेसाठी लागणारी पात्रता,नियम,अटी,लागणारे कागतपत्र, तपासून या योजनेत सहभागी होऊ शकता. या माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत...
भाग्यश्री योजनेचे फायदे आणि पात्रता जाणून घेऊ या.
माझी कन्या या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलगी जन्माला आल्यावर शासनाकडून ५००००/- हजार रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. यात प्रतेक कुटुंबातील दोन मुलींनाच हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा अधिक मुली असल्यास योजनेचा लाभ घेत येणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमच स्वरूपीचे रहिवासी असणेबंधनकारक आहे. तसे असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.अन्यथा अर्ज करता येणार नाही.माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक.
- पत्त्याचा पुरावा.
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- रेशन कार्ड (बीपीएल श्रेणीसाठी)
- मोबाईल नंबर.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
संपूर्ण अर्ज कसा करावा ?
- तुम्हालाही माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी पुढील प्रमाणे अर्ज करावा लागेल.
- अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड बटना वरती क्लिक करून तो डाउनलोड करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सविस्तर सर्व फॉर्म भरावा लागेल आणि विचारलेली सर्व माहिती एकदम बरोबर टाकावी लागेल.
- यानंतर, तुम्हाला भरलेल्या फॉर्मसोबत विचारलेल्या सर्व कागदपत्राची प्रत जोडावी लागेल.
- आता भरलेला फॉर्म आणि त्या सोबत जोडलेली सर्व कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील.
- यानंतर तुमच्या संपूर्ण अर्जाची तपासणी केली जाईल आणि सर्वकाही योग्य(बरोबर)असल्यास तुमच्या मुलीच्या नावे ५०,०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
संपूर्ण अर्जची pdf फाईल डाऊनलोड करा 👉(Click here)
👇ही योजना देखील बघा👇
शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा १४ वा हप्ता जमा होणार !👉(Click here)
वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



