रायगडमधील खालपूरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. रात्री ११ च्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ५० घरांवर डोंगराचा ठिगारा कोसळला आहे. यात १५ ते २० लहान मुलांसह १०० पेक्षा अधिक लोक हे मातीच्या ठिगाऱ्याखाली अडकले आहेत. दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. २५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेचे भयंकर थरारक फोटो समोर आले आहेत.
अग्निशमन दलाच्या १ जवानाचा मृत्यू.
५ जणांसह अग्निशमन दलाच्या १ जवानाचा मृत्यू .त्यामुळे गावातील ४० ते ५० घरे अजूनही मातीत गाडली गेली आहे. त्यानंतर रात्री ५ ते ६ नागरिकांचे मृतदेह मलब्यातून बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे. या ठिकाणी जात असताना NDRF च्या एका जवानाचाही मृत्यू झाला आहे. इर्शाळवाडी गाव हे डोंगरावर असल्याने तेथे कोणतेही वाहन जात नाही. गावावर दरड कोसळल्याने सर्वत्र हाहाकार उडाला आहे.
प्रशासनाने मदतीसाठी जारी केला हेल्पलाईन नंबर 8108195554
प्रशासनाने मदतीसाठी 8108195554 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. घटनास्थळी मुख्यमंत्री दाखल झाले आहेत. या घटनेत १०० पेक्षा अधिक लोक अडकले आहेत. नागरिकांना नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी आणि इर्शाळवाडीतील माहिती घेण्यासाठी हा नंबर पोलिसांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत रायगड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच मदतकार्यासाठी २ हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
👇हे देखील वाचा👇
लोकलमधून उतरताना बाळ निसटलं👉(Click here)
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |





