Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana.
१) आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्र. गणना / नमो शेतकरी महासन्मान निधी नस्ती/१८११२/२०२३, दि.३१.०५.२०२३.
२) कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्रमांक: किसनि-२०२३/प्र.क्र.४२/११-ओ, दि.१५.०६.२०२३.
सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मा. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केलेल्या घोषणेस अनुसरुन, अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी रुपये ६,०००/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये ६,०००/- इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्र.३ येथील दि.१५.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्र सूचना आणि नियम विकसित करुन तसेच नवीन बचत बँक खाते उघडून सदर योजना सार्वजनिक आणि वित्तीय व्यवस्थापन या द्वारे राबविण्यात येणार आहे..
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे
आयुक्त (कृषि) यांनी संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरुन, राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती आयुक्त (कृषि) यांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यासाठी परवानगी देणेबाबत तसेच सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे सदर योजना राबविताना येणाऱ्या विविध अडचणी विचारात घेऊन सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीमधील मेकर, सहायक चेकर तसेच चेकरची भूमिका सोपविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यास बाबतीत शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:-
राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी ही एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या संदर्भात प्रशासकीय खर्चासाठी १ अशी एकूण २ स्वतंत्र बचत खाती “बँक ऑफ महाराष्ट्र" या राष्ट्रीय कृत बँकेत खाते उघडण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय या विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि. २७.०९.२०१७ रोजीच्या शासन निर्णयामधील खालील नमुद अटी व शर्तींच्या अधीन राहून तसेच वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. १७८/२३ / कोषा प्रशा-५, दि. ११.०७.२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
१) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान वितरित करण्याकरिता आणि राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या शाकीय खर्चाकरिता उघडण्यात येणाऱ्या बचत बँक खातेत्यांचा वापर केवळ त्याच काम करिता करण्यात यावा.
२) बचत बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला निधी त्याचा व्याज तसेच योजनेच्या कामांच्या प्रगतीनुसार लागणाऱ्या निधीचा योग्य वेळो वेळी आढावा घेऊन त्याबाबतच अहवाल सादर करावे.
३) सदर बचत बँक खात्यावरील व्याजाची रक्कम आणि शिल्लक रक्कम याचा व्यवस्थित लेखा जोखा घेऊन निश्चित होणारी रक्कम ही शासकीय कार्यलयाच्या दैनंदिन लेख्यामध्ये जमा करावी.
४) सदर बँक खात्यात खूप काळ निधी बिनावापर पडून राहणार नाही या हिशोबणी तात्काळ नियोजनासाठी आवश्यक असेल त्याचवेळी कोषागारातून निधी आहरित करण्यात यावा.
५) नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाल्यास त्या योजनेचे बचत खाते बंद करण्यात यावे. सदरची जबाबदारी ही आयुक्त स्तरावर कृषि आयुक्त यांची असेल.
६) (१) सदर खात्यातील व्यवहार फक्त सार्वजनिक आणि वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे होणार असल्यामुळे ज्या ज्यावेळी ह निधी खर्च करावयाचा असेल त्या त्यावेळी सक्षम अधिकाऱ्याने बँकेच्या नावे निधी वितरणाचे आदेश (Fund Transfer Order)द्यावे. त्यासाठी सार्वजनिक आणि वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवर लॉगईन करुन आलेला Fund Transfer Order तयार करण्यात यावी. सदर काम मेकरचे असेल. (२) सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे बचत खात्यातील व्यवहार करण्यासाठी कृषि आयुक्तालय,पुणे या कार्यालयातील उपायुक्त म्हणजेच(कृषि गणना) हे मेकर (Maker) असतील व सहाय्यक संचालक (लेखा-१) हे सहाय्यक चेकर (Assistant Checker) असतील तसेच आयुक्त (कृषि) हे अंतिम चेकर (Final Checker) म्हणून जबाबदार असतील.
७) उपरोक्त (२) प्रमाणे व्यवहार होत असल्याने, कोणत्याही परिस्थितीत चेकबुकचा वापर होणार नाही. त्यामुळे सदर खाते विना चेकबुकचे असल्याबाबत लेखी आदेश सर्व संबंधितांनी त्यांच्या स्तरावरुन बँकेस द्यावेत.
८) सदर खात्यातून रोख अथवा चेकबुक अथवा विड्रॉवल स्लिप (Withdrawal Slip) या मार्गाने व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात येत आहे.
९) आयुक्त (कृषि) स्तरावर आवश्यकतेनुसार विड्रॉवल (Withdrawal) ही सुविधा उपलब्ध असेल.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७२८१५४२३१६५०१ असा आहे. हा आदेश
वरील शासन निर्णय आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
VERRY BEST
ReplyDelete