Type Here to Get Search Results !

पावसाळ्यात गड किल्ले ट्रेकिंगसाठी फिरण्याची ठिकाणे | Pavsalyat Gad-Kille Tracking Sathi Firnyachi Best Thikane

आता मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून सर्वच ठिकाणी पावसाचा जोर असल्याचं दिसून येतंय. पाऊस म्हटलं की आपल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात,सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येत ते म्हणजे गरमागरम चहा आणि मस्त गरमागरम कुरकुरीत भजी..तसेच पावसाळा म्हटलं की आणखी एक गोष्ट आवर्जून करावी वाटते ती म्हणजे ट्रेकिंग.पाऊस सुरू झाला की अनेकांची पावलं गड-किल्ल्यांकडे वळतात आणि आजाकल्याच्या तरुणाईमध्ये ट्रेकिंगला जाण्याचं वेगळंच क्रेझ असतं .अशा वेळी आपण पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचं तरी कुठे? असा प्रश्न सर्वाना पडला असेल मी तुम्हाला काही गड-किल्ल्यांची नाव सुचवतो त्यातील तुम्हाला जे शक्य वाटेल त्या गड-किल्ल्यांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता.

१. हरिहर किल्ला, नाशिक (Harihar Fort, Nashik)



पावसाळ्याच्या एकदम अल्हाददायी वातावरणात त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्याला भेट देणं हे एक उत्तम ट्रेकिंगला जाण्याचं ठरेल. ह्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या चढाईसाठी सोप्या आणि तितक्याच अवघड असल्या तरी कसे बसे किल्ल्यावर गेल्यावर उंचावरुन दिसणारं निसर्गाचं भव्य दिव्य नयनरम्य दृश्य डोळ्याची पारणं फेडतं. हरिहर किल्ला(Harihar Fort) हा ट्रेकिंगसाठी थोडा अवघड आणि चढण्यासाठी किचकट असला तरी ते साहस करण्यास आजच्या तरुणाईला आवडतं.


ट्रेकिंगवेळी खबरदारी घेणंही तितकंच म्हत्त्वाची आहे. हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी मुंबईसह,ठाणे ,कल्याण,अहमदनगर आणि नाशिक येथून पर्यटक येत असतात. इगतपुरी - त्र्यंबक पट्ट्यातील हा गड असल्यामुळे येथे पावसाचे प्रमाण देखील जास्त आहे.

२.कळसुबाई शिखर (Kalsubai shikhar)


ज्यांना लोकांना साहसी आणि आव्हानात्मक गड चढायला आवडतं त्या लोकांसाठी कळसुबाई शिखर हे एक उत्तम ठिकाण ठरेल.कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे ह्याची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर एवढी आहे . अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे. पावसाळा सुरू झाली की येथे खूप लांब लांबून येणाऱ्या पर्यटकांची आणि ट्रेकर्सची खूप मोट्या प्रमाणात गर्दी या शिखरावर(Kalsubai ) होते. कळसुबाई शिखर चढत असताना तुम्ही आपण चलो त्या पायवाटांवरुन खाली पाहिल्यास तुम्हाला हिरवीगार शेती दिसेल. पर्यटकांना चढाईसाठी सोपं जावं म्हणून आधीमधी दगडाचे वट्टे देखील बसवण्यात आल्या आहेत .

पावसाळ्यात तुम्ही कळसुबाई शिखरावर गेलात तर उंचावर धुकं पसरलेली दिसतात जस कि आपण त्या धुकावरती असल्याचा भास होती ती मंज्या काही वेगळीच आहे. कळसुबाई शिखराच्या अंतिम पॉईंटवर पावसाळ्यात कडक्यांची थंडी असतेच त्या सोबतच आपल्यावर पावसाचा मारा तो गार वारा ती दाटलेली धुकं त्या धुकातून मस्त रमत गंमत , मंज्या मस्ती करत जाणे ही एक येणारी मज्जा काही वेगळीच असते.


३.हरिश्चंद्रगड, (Harishchandragad)


सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आणि कळसुबाई शिखराला लागून असलेला हरिश्चंद्रगड आपण एकदा तरी भेट द्यावी.हरिश्चंद्रगड(Harishchandragad) म्हणजे समस्त ट्रेकर्सची आणि पर्यटकांची पंढरी आस म्हटल तर काही हरकत नाही. ट्रेकिंगचं वेड असलेला प्रत्येकजण आपल्या आल्या आयुष्यात हरिश्चंद्रगडावर जाऊन येतो गडावरीलप्राचीन शिवमंदिर, पुष्पकर्णी,तिथल्या गुहेत घालवलेली ती एक रात्र हे सगळं प्रत्येकानं अनुभव घ्यायचा असतो.


हरिश्चंद्र गडावरी कोकणकड्याला जाणं हा तर एक अद्भूत कधी न विसरता येणार अनुभव आहे. पावसाळ्यात गर्द धुक्यांमध्ये हा गड एकदम हरवून जातो आणि मग त्यातून हळू हळू वाट काढत पुढे जाण्यात एक अनोखीच मज्जा असते.

४. रतनगड (Ratangad)



अहमदनगर जिल्हात अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई शिखरापासून काही तासांच्या अंतरावर असलेला अजून एक गड किल्ला म्हणजे रतनगड एकाच पट्ट्यातील या गड किल्ल्यांवर पावसाळ्यात ट्रेकर्सची गर्दी होते. ट्रेकिंगदरम्यान वाटेत असणाऱ्या रंगीबेरंगी फुलांमुळे आपल्याला सताऱ्यातील कास पाठरची आठवण करून देतो.


हा एक वेगळा अनुभव रतनगडचा (Ratangad) प्रवासात मन मोहून टाकतो. हलक्या हलक्या धुक्यात रिम जीम पडणार पाऊस या मुले गड सर करण्यासाठी एक वेगळीच मझ्या येते. रतनगडावरुन दिसणाऱ्या सांधण दरीची (Sandhan Valley)मन मोहक दृश्य देखील आपल्याला पाहायला दिसतात.


गडावर गेल्यावर गणेश दरवाजा,रत्ना देवीची (मंदिर),मुक्कामासाठीची गुहा,मुख्य दरवाजा.(यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात),इमारतींचे जोते.(गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे अवशेष),कडेलोट पॉइंट,राणीचा हुडा (भग्न बुरूज), प्रवरे नदीचेउगमस्थान,मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज,अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तळे,कल्याण दरवाजा.ही काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.

५. लोहगड किल्ला, लोणावळा (Lohgad Fort, Lonavala)



ट्रेकिंगसाठी लोणावळ्यातील लोहगड किल्ला (Lohgad Fort) हा पर्यटकांचा अतिशय आवडता ठिकाण आहे.पावसाळा सुरू झाला रे झाला की एथे मुंबई - पुण्यातील पर्यटकांची पावलं आपोआप लोहगडाच्या दिशेने वळू लागतात.

लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तु आणि ठिकाणं आहेत. विंचुकडा, उलटा वाहणार धबधबा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा अशी बघण्यासारखी ठिकाणे आहेत. या गडावरुण पवना धरणाची मनमोहक दृश्य दिसतात. पायऱ्याचा रस्ता आणि लोहगडाला लाभलेला ऐतिहासिक वारसा यामुळे या किल्ल्याचं सौंदर्य आणखी वाढतं.


६. कलावंती दुर्ग, पनवेल (Kalavantin Durg, Panvel)



पावसाळा आला की आपल्याला आठवतो तो अजून एक गड तो म्हणजे पनवेल शहराजवळ असणारा कलावंती दुर्ग हा कलावंती दुर्गाकडे सर्व ट्रेकर्स मंडळींची पावलं हळू हळू वळू लागतात.कलावंतीण दुर्गावरील (Kalavantin Durg) निमुळत्या छोट्या पायऱ्या, त्यावरुन कोसळणारं पांढराशुभ्र पाणी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असं चित्तथरारक दृश्य येथे पाहायला मिळतं. पावसाळ्यात कलावंतीण दुर्गावर जात असाल तर आपण थोडी खबरदारी घेतली पाहिजे.


या दुर्गाच्या पायवाटांवर एका बाजूला कसलाच आधार नसल्याने सरळ खाली पडण्याची भीती असते, त्यामुळे ज्यां लोकांना उंचीची भीती वाटते त्या लोकांनी कलावंतीण दुर्गावर जाणं टाळावं. नाहीतर आपली एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते मात्र ट्रेकर्ससाठी हा एक चित्तथरारक अनुभव ठरेल. मुंबई-पुण्याचे लोक पावसाळ्यात या गडाला आवर्जुन भेट देतात. कलावंतीण दुर्गाला लागूनच प्रबलमाची किल्ला असल्याने तिथे देखील गिर्यारोहकांची गर्दी असते.
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.