नमस्कार मित्रानो, आज सकाळी आपण उठल्यावर बऱ्याच जणांना Emergency Alert: हा मॅसेज पाहायला मिळाला असेल, तर हा मॅसेज आपल्याला DEPARTMENT OFTELECOMMUNICATIONS च्या अंतर्गत पाठवण्यातआलेला आहे. हे नवीन काय आहे ? हा मॅसेज कशामुळे वा का पाठवण्यात आला आहे ? या सर्व विषय बाबबत चिंता तुम्हाला नक्कीच लागली असेल, तर मित्रानो या मध्ये घाबरण्यासारखे काहीही आस कारण नाही. मित्रानो हा मॅसेज दूरसंचार विभागा अंतर्गत देशातील सर्वाना पाठवण्यात आला आहे. या विषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती या लेखामध्ये वाचायला मिळनार आहे.
EMERGENCY ALERT: आज आलेला मेसेज नेमका या मागे काय करण होत आणि हा मॅसेज कुणी पाठवला असेल ?
Emergency Alert: आज घडलेली अचंबित घटना म्हणजे भरपूर लोकांना आज सकाळी पूर्व सूचना नसल्यामुळे लोक विचारात पडले आहेत कि असा मेसेज आपण काही न करता अचानक कसा आला आहे म्हणून. तर घाबरून जन्या सारखा काही नाही. भारत सरकारने देशभरातील लाखो करोडो नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या सर्व मोबाईल फोनवर संपूर्ण देशव्यापी आपत्कालीन इशारा जारी केला आहे. ही आपत्कालीन सूचना वायरलेस इमर्जन्सी अलर्ट (WEA) प्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आला आणि एका विशिष्ट म्हणजेच ठराविक क्षेत्रातील सर्व सक्रिय(चालू) मोबाइल फोनवर पाठविण्यात आला आहे. या मेसेज मध्ये त्यांनी स्पष्ठ उल्लेख केला आहे कि हा फक्त एक सराव (चाचणी) मेसेज / संदेश आहे. याचा उपयोग हा भविष्यात उद्भाणाऱ्या धोक्याबद्दल आणि येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल महत्त्वाची माहिती देण्यात येऊ शकते.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत या मध्ये भविष्यात अलर्ट हा आपल्याला मोबाईल वर मेसेज द्वारे येऊ शकतात. हा मॅसेज देशातील सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन मदत वाढविण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची एक भाग असलेली सावधान ही चेतावणी प्रणाली प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर भारतात वापरली गेली. हा अलर्ट चेतावणी मॅसेजच्या स्वरूपात येईल. यात सर्व लोकांचे लक्ष त्वरित वेधून घेण्यासाठी आणि एक विशिष्ट मोठा आवाजासह हा मेसेज पाठविण्यात आलेला आहे. देशातील आणीबाणीच्या सूचना संदेशाच्या माध्यमातून सामान्यतः धोक्याच्या स्वरूपा विषयी थोडक्यात परंतु खूप महत्त्वाची माहिती या मधून भविष्यात उपयोगी येऊ शकते.
EMERGENCY ALERT:
ह्या प्रणाली चा उद्देश कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या आपत्कालीन आपत्तींची पूर्व सूचना करून आणि अधिक लोकांना मदत होईल यासाठी या सुविधेचा वापर भविष्यात केला जाऊ शकतो. या मध्ये सध्या कोणत्याच माध्यमातून सरकारने देशव्यापी आपत्कालीन इशारे जारी करण्याचे कोणतेही विशिष्ट कारण देखील घोषित केले नाही. अशा या सूचनेचा फायदा खासकरून नैसर्गिक आपत्तींसाठी म्हणजे भूकंप, पूर, चक्रीवादळ, यासाठी केला जाऊ शकतो. म्हणजे ज्या त्या विशेष भोगोलिक दृष्ट्या खडतर क्षेत्रातील लोकांना याचा अलर्ट दिला जाईल. अश्या सर्व परिस्थितीसाठी लोकांना ह अलर्ट मेसेज मिळणार आहे. अश्या सुविधेचा वापर करून येणाऱ्या संभाव्य धोका आणि जीवित हानी कमीत कमी करता येऊ शकते.
या सुविधेचा वापर करून आपल्या सरकारला मोठ्या मोठ्या लोकसंख्येच्या भागापर्यंत त्वरित पोहोचून अलर्ट देता येणार आहे. मग ते कुठेही राहत असतील किंवा मोबाईल मध्ये कोणतेही सीम कार्ड असला तरी हे सगळी महत्वाची अपडेट हे अलर्टच्या माध्यमातून लोकांला मिळतील. भविष्यात अश्या स्वरूपाच्या येणाऱ्या अलर्ट बद्दल लोकांनी गांभीर्याने लक्ष देणे आणि सूचनाचे पालन करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. हे तंत्रज्ञान या आधी जागा मध्ये सर्वात आधी जपान या देशाने वापरले आणि ते आजून देखील वापरल जात आहेत जिथे भूकंप आणि सुनामी सारखे नैसर्गिक आपत्तीचे अपडेट लोकांना आधीच दिले जातात. हि चेतावणी प्रणाली आपल्या देशा मध्ये नवीन आहे आणि भविष्यात या मध्ये काही नवीन बदल सुद्धा करू हे अपेक्षित आहे. सदर मॅसेज आणि अलर्ट बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळताच आपल्याला या लेखामध्ये किंवा आपल्या www.aaaplichawdi.com या सन्केतस्थळावर कळविण्यात येईल.
पुन्हा एकदा हि एक नवीन सरकारी अलर्ट देणारी प्रणाली आहे याचा नक्कीच लोकांना फायदा होईल. आणि जास्तीत जास्त लोकांना आपत्कालात मदत मिळण्यात मदत होईल. जय महाराष्ट्र /जय हिंद जय भारत
वरील माहिती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |


