Type Here to Get Search Results !

Innova and Nano car accident in Malshej Ghat | माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक

Innova and Nano car accident in Malshej Ghat.

माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक

Innova and Nano car accident.

माळशेज घाट परिसरात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक इन्होवा २५/३० फुट ओढ्यात कोसळली. माळशेज घाट चढाईच्या आगोदर खाली फागुळगव्हाण गाव परिसरात कल्याण अहमदनगर महार्गावर इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक झाली सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तर इन्होवा गाडी थेट शेजारी वाहत असणाऱ्या ३० फूट ओढ्यात जाऊन पडली. या वाहनातील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या माळशेज घाट परिसरात मुंबईच्या दिशेकडून येताना इन्होवा कार आणि नॅनो कारची समोरासमोर जोरात धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांची मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आले. मात्र इन्होवा कार घाटाच्या शेजारी वाहत असणाऱ्या ३० फूट ओढ्यात जाऊन पडली. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक

 car accident.

या घटनेमुळे घाट परिसरात एकच गर्दी झाली होती. प्रशासनाकडून माळशेज घाटात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे घाटात फिरायला येताना अथवा प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आजचा घडलेला अपघात हा काळजात धस करणारा असाच आहे. माळशेज घाट परिसरात सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात धुके आणि रिमझिम पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहनाचे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दोन्ही गाड्यांची झालेली समोरासमोर धडक ही एकदम जोरात अशीच होती. नॅनो गाडीचे यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

       



👇हे देखील वाचा👇

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा मोठा अपघात👉(Click here)


वरील थोडक्यात बातमी आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.