Type Here to Get Search Results !

हात-पाय बांधलेले, तोंड अन् डोळ्यांवर पट्टी; आश्रमात सापडली साधूची बॉडी सापडली, गावात खळबळ | Saint Mohandas murder

हात-पाय बांधलेले, तोंडाला आणि डोळ्यांना चिकटपट्टी लावलेली, अशा स्थितीत साधूचा मृतदेह सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली. गावकरी मोठ्या संख्येनं रुग्णालयाबाहेर जमले.

Saint Mohandas murder
Saint Mohandas murder

जयपूर : संत मोहनदास यांच्या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील दिडवाना-कुचमन जिल्ह्यात ही घटना घडली. संत मोहनदास ७० वर्षांचे होते. त्याचे हात पाय दोरीने बांधलेले होते. या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. ही घटना कुचामण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रसाळ गावात घडली.

नरसिंह (३०) नावाचा भाविक सोमवारी सकाळी ८ वाजता आश्रमात आला. त्यांनी संत मोहनदासांना बोलावले. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तो आश्रमाच्या मागे असलेल्या व्हरांड्यात गेला. तेथे त्यांना मोहनदासचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. त्याचे हात-पाय बांधलेले होते. तोंड आणि डोळ्यांवर पट्टी बांधली होती. मृतदेहाजवळ रक्त सांडले होते. नरसिंह यांनी याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. साडेआठ वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले.

भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू.


पोलिसांनी मोहनदासचा मृतदेह शवागारात ठेवला. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. रविवारी रात्री ८ मोहनदास गावकऱ्यांशी गप्पा मारत होता. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत झोपायला गेले. गावकरीही घरी परतले. मोहनदास रात्री आश्रमात एकटाच होता. मोहनदासचा मृतदेह सापडल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली.

Saint Mohandas murder
Saint Mohandas murder

गेल्या १४ वर्षांपासून मोहनदास रसाळ गावाबाहेरील हरिराम बाबांच्या आश्रमातील भैरुबाबा मंदिरात सेवा करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. त्याचं कुटुंब गावातच राहतं. मोहनदास रात्री आश्रमात एकटेच झोपायचे. दिवसभरात दोन शिष्य त्याच्यासोबत होते. दोघेही रात्री गावातील गोशाळेत झोपायला जात. सकाळी ८ ते ८ आठ या वेळेत आश्रमात ग्रामस्थांची ये-जा असायची.

मोहनदास यांच्या मृत्यूची बातमी समजताच गावकरी रुग्णालयाच्या शवागाराबाहेर जमा झाले. मोहनदासच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी मोहनदासच्या कुटुंबीयांनी केली. जोपर्यंत पोलिस आरोपींना अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मोहनदासची हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


👇हे देखील वाचा👇

भीषण दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू.👉(Click here)

अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.


Google News

👉 (Click here)

व्हॉट्सअँप ग्रुप

👉 (Click here)

टेलिग्राम ग्रुप

👉 (Click here)

इन्स्टाग्राम पेज

👉 (Click here)

फेसबुक पेज

👉 (Click here)

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.