Mission Raniganj - The Great Bharat Rescue Official Teaser.
Mission Raniganj - The Great Bharat Rescue Official Teaser.
Mission Raniganj - The Great Bharat Rescue Official Teaser: अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'मिशन राणीगंज' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अक्षय कुमार वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे.. चित्रपटाचा टीझर शेअर करताना अक्षयने एक ट्विट केले आहे. तसेच १९८९ मध्ये एका व्यक्तीने मोठी हिंमत दाखवली होती आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचवले होते, भारताच्या खऱ्या नायकाची कहानी नक्की पाहा, असे आवाहनही अक्षय कुमारने केले.
'मिशन राणीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू' ६ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट राणीगंज कोलफिल्ड आणि भारताच्या कोळसा बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे दिवंगत जसवंत सिंग गिल यांच्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने वीर जसवंत सिंग गिलची भूमिका साकारली आहे.
खिलाडी कुमार हा वास्तविक जीवनावर आधारित चित्रपट आणि पात्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखला जातो. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मिशन रानीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू' हे देखील याचेच एक उदाहरण आहे, ज्याच्या टीझरने संपूर्ण इंडस्ट्री आणि अक्षय कुमारच्या चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.
Mission Raniganj Official Trailer
मिशन राणीगंज 'Mission Raniganj' चित्रपटाची कथा आहे.
वीर जसवंत सिंग गिल यांनी नोव्हेंबर १९८९ मध्ये राणी गंजमधील पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या सर्व मजुरांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे जगातील सर्वात मोठे आणि यशस्वी बचाव अभियान मानले जाते. हा चित्रपट एक वास्तविक कथा सांगतो जी सांगणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत, चित्रपटाचा टीझर रहस्य, धैर्य आणि खडतर आव्हानांवर मात करणारा आहे. अक्षय कुमारचे चित्रपट हे 'कधी कधी वास्तव कल्पनेच्या पलीकडे असते' या जुन्या म्हणीचा पुरावा आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि आता या टीझरने प्रेक्षकांणा आणखीनच उत्सुकता वाढवली आहे.
या दिवशी मिशन राणीगंज 'Mission Raniganj' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
वाशू भगनानी प्रस्तुत पूजा एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या 'मिशन राणीगंज'ची निर्मिती वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले आहे. देश आणि जगाला हादरवून सोडणारी ही कोळसा खाण दुर्घटना आणि जसवंत सिंग गिल यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथकाच्या प्रयत्नांमुळे हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |




It's true story bes movie.
ReplyDeleteYes.
Delete