राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. बियाणे अनुदान योजना २०२३ अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळविण्यासाठी अर्ज सुरू झाले आहेत. बियाणे अनुदान योजने अंतर्गत रब्बी बियाण्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आजच्या पोस्टमध्ये Rabi Biyane Subsidy Scheme in Maharashtra 2023 अंतर्गत अर्ज कसा करावा? त्याचप्रमाणे या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
रब्बी बियाणे अनुदान योजना महाराष्ट्र.(Rabi Biyane Subsidy Scheme Maharashtra)
आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना प्रमाणित आणि दर्जेदार बियाणे अनुदानावर उपलब्ध उपलब्ध व्हावे. यासाठी महाराष्ट्रात ही बियाणे अनुदान योजना २०२३ राबविण्यात येत आहे. बियाणे अनुदान योजना (Rabi Biyane Anudan Yojana) ही नवीन अंतर्गत तृणधान्ये पिके तसेच कडधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रसार करण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात या वाणाची लागवड करण्यासाठी बियाणे अनुदान योजनाराबविण्यात येत आहे.
आता रब्बी हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणांची आवश्यकता पडणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणांचे वाटप करण्यात येत आहे. बियाणे अनुदानासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. Seed subsidy scheme 2023 अंतर्गत रब्बी हंगामासाठी बियाणे, तृणधान्ये व कडधान्य बियाणे आणि ज्वारी,गहू,मका,करडई यांचे वाटप करण्यात येणार आहे.
बियाणे अनुदान योजना २०२३ अर्ज प्रक्रिया (Biyane Anudan Yojana Maharashtra)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या बियाणे अनुदान योजना २०२३अंतर्गत अर्ज Maha Dbt Farmers Portal वर ऑनलाइन करायचे आहेत. Biyane Anudan Yojana अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करून अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येईल.
बियाणे अनुदान योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
बियाणे अनुदान (Biyane Anudan Yojana) योजनेंतर्गत अनुसूचित जाती व जमाती तसेच सर्वसामान्य शेतकरी व महिला,अल्प व अत्यल्प भूधारक या शेतकरी बांधवांनी अर्ज करायचा आहे.Seed subsidy scheme 2023
बियाणे अनुदान योजना- आवश्यक कागदपत्रे !
१) ७/१२ प्रमाणपत्र
२) ८-अ प्रमाणपत्र
३) खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
४) केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
५) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
६) हमीपत्र
७) पूर्वसंमती पत्र
बियाणे अनुदान योजनेंतर्गत भेटणारे अनुदान?
हरभरा: बियाणे अनुदान योजना (Seed subsidy scheme 2023) अंतर्गत हरभरा पिकासाठी १० वर्षांच्या आतील वाणास २५ रुपये प्रति किलो दरा प्रमाणे अनुदान दिला जातो.
ज्वारी: बियाणे अनुदान योजना (Biyane Anudan Yojana Maharashtra) अंतर्गत १० वर्षे जुन्या वाणांच्या रब्बी ज्वारी पिकासाठी १५ रुपये प्रति किलो दरा प्रमाणे अनुदान दिला जातो.
गहू: बियाणे अनुदान योजना (Biyane Anudan Yojana Maharashtra) अंतर्गत १० वर्षा आतील वाणस २० रुपये प्रति किलो दर आणि १० वर्षावरील वाण १० रुपये प्रति किलो दरा प्रमाणे अनुदान दिला जातो.
करडई: बियाणे अनुदान योजना (Seed subsidy scheme 2023) अंतर्गत करडई पिकासाठी १० वर्षांच्या आतील वाणास ४० रुपये प्रति किलो दरा प्रमाणे अनुदान दिला जातो.
संकरित मका: बियाणे अनुदान योजना (Seed subsidy scheme 2023) अंतर्गत संकरित मका पिकासाठी १० वर्षांच्या आतील वाणास ९५ रुपये प्रति किलो दरा प्रमाणे अनुदान दिला जातो.
बियाणे अनुदान योजना २०२३ महाराष्ट्र (Biyane Anudan Yojana 2023 Maharashtra) अंतर्गत हरभरा,गहू,रब्बी ज्वारी, करडई तसेच संकरित मका या पिकांकरिता पीक प्रात्यक्षिक अंतर्गत महाडी-बीटी पोर्टल वर संपूर्ण अर्ज केल्यानंतर गावातील लॉटरीमध्ये निवड झालेल्या २५ शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.आणि इतर शेतकऱ्याना वर दिलेल्या किंमती प्रमाणे अनुदान देण्यात येईल.
बियाणे अनुदान योजना लाभ वितरण प्रक्रिया !
ज्या शेतकऱ्यांनी बियाणे अनुदान योजनेंतर्गत महा डीबीटी शेतकरी पोर्टल (maha dbt farmers portal) वर ऑनलाइन अर्ज केले आहेत, अश्या शेतकऱ्यांना लॉटरी पद्धतीने अनुदान देण्यात येते. तुमच्या गावातील महा डीबीटी पोर्टलच्या लॉटरीनंतर तुमची निवड झाली आहे. त्यानंतर तुम्हाला बियाणे सबसिडी मिळवण्यासाठी अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून अनुदान वजा करून बियाणे खरेदी करावे लागेल.
सूचना: बियाणे अनुदान योजने अंतर्गत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या जवळच्या कार्यालयाला भेट द्या. शेतकरी बांधवांबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना जरूर शेअर करा. अशा महत्त्वाच्या माहितीसाठी तुमच्या वेबसाईटला भेट देत राहा.

👇ही योजना देखील बघा👇
वरील योजना आपल्या सर्व मित्रांना शेअर करा.आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा तुमचे काही मत मांडायचे असल्यास कृपया कमेंट करा.
अश्याच नव नवीन उपडेटसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Google News | |
व्हॉट्सअँप ग्रुप | |
टेलिग्राम ग्रुप | |
इन्स्टाग्राम पेज | |
फेसबुक पेज |



